Izhar Khan ने दुचाकीवरून महिलांचा पाठलाग करत केले अश्लील कृत्य; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

200
Izhar Khan ने दुचाकीवरून महिलांचा पाठलाग करत केले अश्लील कृत्य; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Izhar Khan ने दुचाकीवरून महिलांचा पाठलाग करत केले अश्लील कृत्य; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमध्ये पोलिसांनी दि. २६ नोव्हेंबर रोजी तरुणींसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या इजहार खान याला अटक केली आहे. इजहार खान (Izhar Khan) मागील एक महिन्यांपासून शहरातील अनेक महिलांसोबत छेडछाड करत असे. पोलिसांनी इजहार खानच्या दुचाकीलाही सील केले आहे. इजहार खानने दुचाकीच्या डिक्कीत महिलांची अंतरवस्त्रे ठेवली होती. पोलिस महिलांची अंतरवस्त्रे गाडीत ठेवण्यामागच्या कारणाचा तपास करत आहे.

( हेही वाचा : आरटीओने रद्द केले ३९ हजारांपेक्षा जास्त Driving license; हे आहे कारण…

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण भोपाळ (Bhopal) चुनाभट्टी परिसरातील आहे. यशोदा विहारमध्ये (Yashoda Vihar) राहणाऱ्या महिला एका दुचाकीस्वाराच्या अश्लील कृत्यांनी पीडित होत्या. दि. २५ नोव्हेंबर रोजी दोन महिलांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान एक दिवस पीडित महिलेने आपल्यासोबत विनयभंग होत असताना अत्याचाराविरोधात आवाज उठवला. तेव्हा लोकांनी दुचारीस्वाराला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. पोलिस तपासात आरोपीने आपले नाव इजहार खान नाव असल्याचे सांगितले. (Izhar Khan)

इजहार खानचे (Izhar Khan) अम्मी-अब्बा दोघेही शिक्षक आहेत. त्याच्या कुटुंबियांनी सांगितले की, या प्रकरणाबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. तसेच इजहारने आपली ओळख लपवण्यासाठी दुचाकीच्या नंबर प्लेटवर कागद चिकटवला होता. दुचाकी पोलिसांनी तपासली असता डिक्कीत महिलांची अंतरवस्त्रे सापडली. इजहार खानने पोलिसांसमोर दोन्ही विनयभंगाच्या घटनांची जबाबदारी स्विकारली. पोलिस इजहार खानच्या (Izhar Khan) कृत्याचा तपास करत आहे. त्यादरम्यान इजहार पीडित महिलांना धमकावत होता, असे लक्षात आले. पोलिसांनी त्याला मानसिकरोगी आरोपी असल्याचे सांगितले. तो पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उलट सुलट उत्तर देत असल्याचे ही उघड झाले आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.