PM Narendra Modi यांनी काँग्रेसला पकडले कोंडीत, म्हणाले काँग्रेसच्या डीएनएमध्येच आरक्षणविरोध!

142
PM Narendra Modi यांनी काँग्रेसला पकडले कोंडीत, म्हणाले काँग्रेसच्या डीएनएमध्येच आरक्षणविरोध!

हरियाणातील निवडणूक (Haryana Election) प्रचारासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. देशातील आघाडीच्या नेत्यांकडून निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी (२५ सप्टेंबर) सोनीपत येथील निवडणूक सभेत सांगितले की, ‘मी आज जो काही आहे त्यात हरियाणाचे मोठे योगदान आहे. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आणि काँग्रेसवर घराणेशाही वाढवल्याचा आरोप केला. तसेच काँग्रेसच्या १० वर्षांपूर्वीच्या कारभारावर टीका करताना मोदींनी भ्रष्टाचाराला काँग्रेसनंच जन्म दिल्याचा उल्लेख केला. तसेच, यावेळी त्यांनी काँग्रेसच्या डीएनएमध्येच आरक्षण विरोध असल्याचंही विधान केलं. (PM Narendra Modi)

राजघराणे हे देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंबः पंतप्रधान मोदी

काँग्रेसवर हल्लाबोल करताना PM Narendra Modi म्हणाले, काँग्रेसचे राजघराणे (Corrupt Congress Family) देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे. एखाद्या पक्षाचा हायकमांड भ्रष्ट असेल, तेव्हा सर्वसामान्य जनतेला लुटण्याचा खुला परवाना असतो. सुमारे १० वर्षांपूर्वी हरियाणात काँग्रेसचे सरकार असताना राज्याची कशी लूट झाली. ते पुढे म्हणाले, “येथे शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या गेल्या, राज्य दलाल आणि जावयाच्या हाती दिले गेले. तुम्हा सर्वांना माहीत आहे की, काँग्रेसला जिथे जिथे संधी मिळाली, जिथे जिथे पाऊल ठेवले तिथे भ्रष्टाचार आणि घराणेशाही निश्चित आहे. काँग्रेस हा आपल्या देशातील सरकारी व्यवस्थेत भ्रष्टाचार निर्माण करणारा आणि वाढवणारा पक्ष आहे. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – mahadji shinde chhatri स्मारकाचा काय आहे दैदिप्यमान इतिहास?)

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरियाणातील सोनीपतमध्ये बोलताना काँग्रेसकडून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप केला. “आता जगभरातले लोक भारतात कंपनी उघडण्यासाठी येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे तुम्हीच विचार करा, हरियाणात कसं सरकार असायला हवं? हरियाणात उद्योगांना प्रोत्साहन देणारं भाजपा सरकार गरजेचं आहे. नोकऱ्या वाढवणारं भाजपा सरकार गरजेचं आहे. तुम्हालाही माहिती आहे, जिथे कुठे काँग्रेसचं सरकार आलं, जिथे त्यांना संधी मिळाली, जिथे जिथे काँग्रेसनं पाऊल ठेवलं, तिथे एक गोष्ट नक्की झाली. भ्रष्टाचार आणि घराणेशाही”, असं मोदी यावेळी म्हणाले. “भारताच्या सरकारी व्यवस्थेत भ्रष्टाचाराला जन्म देणारी, भ्रष्टाचाराचं पालन-पोषण करणारी, आपल्या देशात भ्रष्टाचाराची कुणी जन्मदात्री असेल तर ती काँग्रेस पार्टी आहे. काँग्रेसचा शाही परिवार देशाचा सर्वात भ्रष्ट परिवार आहे.

(हेही वाचा Kamala Harris : डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता कमला हॅरिस यांच्या कार्यालयावर गोळीबार)

“आरक्षणविरोध काँग्रेसच्या डीएनएमध्ये”

“काँग्रेसच्या शाही परिवारातून जो कुणी पंतप्रधान झाला, त्यानं आरक्षणाला विरोध केला. आरक्षणाला विरोध काँग्रेसच्या डीएनएमध्ये आहे. त्यामुळेच आजही काँग्रेसच्या शाही कुटुंबातली चौथी पिढीदेखील आरक्षणाला हटवण्याची चर्चा करते”, अशी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. (PM Narendra Modi)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.