Pune Bulldozar Action : पिंपरी-चिंचवड महापालिकेने अवैध मशीद आणि मदरसा यांवर चालवला बुलडोझर

108
Pune Bulldozar Action : पिंपरी-चिंचवड महापालिकेने अवैध मशीद आणि मदरसा यांवर चालवला बुलडोझर
Pune Bulldozar Action : पिंपरी-चिंचवड महापालिकेने अवैध मशीद आणि मदरसा यांवर चालवला बुलडोझर

पुणे येथील अवैध मशीद आणि मदरसा यांवर बुलडोझरद्वारे कारवाई करण्‍यात आली आहे. महानगरपालिकेने (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) अवैध बांधकामांवर ही कारवाई केली आहे. पुण्‍यातील पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) सर्व अवैध धार्मिक स्‍थळे पाडण्‍यात यावीत, असा आदेश उच्‍च न्‍यायालयाने दिल्‍यानंतर महापालिकेने ही कारवाई केली आहे. (Pune Bulldozar Action) ६ महिन्‍यांपूर्वी अशा सर्व अवैध धार्मिक स्‍थळांना महानगरपालिकेने नोटीसही पाठवली होती; मात्र त्‍याकडे दुर्लक्ष करण्‍यात आले. त्‍यानंतर आता महानगरपालिकेने कारवाई चालू केली आहे. मशीद आणि मदरसा यांच्‍यावर बुलडोझरच्‍या कारवाईला तेथील मुसलमानांचा तीव्र विरोध आहे. ही मशीद वाचवण्‍यासाठी मुसलमान समाजातील लोक मोठ्या संख्‍येने तेथे पोचले. परिस्‍थिती चिघळू नये; म्‍हणून प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्‍त केला होता.

(हेही वाचा – Mumbai Crime : मुंबईतील रुग्णालयात बदलापूरची पुनरावृत्ती टळली; ५ वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न)

आंदोलनाच्‍या वेळी पोलिसांनी मुसलमान समाजातील काही उत्तरदायी नेत्‍यांनाही कह्यात घेतले. त्‍यांना पहाटे ५ वाजता सोडण्‍यात आले. पाडण्‍यात आलेली मशीद पुण्‍याला लागून असलेल्‍या पिंपरी-चिंचवडमधील आहे. साधारण २५ वर्षांपूर्वी येथे मशीद बांधण्‍यात आली होती; मात्र गेल्‍या काही वर्षांपासून अमिया येथील दारूल उलूम जामिया नावाने येथे मदरसा चालवला जात आहे. याविरोधात हिंदु संघटनांनी तक्रारी केल्‍या होत्‍या. या कारवाईत मदरसा पूर्णपणे भुईसपाट करण्‍यात आला असून अवैध बांधकामामुळे मशिदीचा काही भागही पाडण्‍यात आला आहे.

असदुद्दीन ओवैसी यांचा थयथयाट

या प्रकरणी एम्.आय.एम्. (MIM) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले की, पुण्‍यात केवळ एक मशीद पाडली जात आहे. मशिदीच्‍या आजूबाजूची सहस्रो घरेही अवैध आहे. त्‍यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. असा भेदभाव का ? (Pune Bulldozar Action)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.