Ajmer Dargah चे होणार सर्वेक्षण; शिवमंदिर असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयाने सुनावणीस योग्य मानली

164
Ajmer Dargah चे होणार सर्वेक्षण; शिवमंदिर असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयाने सुनावणीस योग्य मानली
Ajmer Dargah चे होणार सर्वेक्षण; शिवमंदिर असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयाने सुनावणीस योग्य मानली

अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती (Ajmer Dargah) यांच्या दर्ग्यात संकट मोचन महादेव मंदिर (Mahadev Temple) असल्याचा दावा करणारी याचिका अजमेर सिव्हिल कोर्टाने स्विकारली आहे. दि. २७ नोव्हेंबर रोजी कोर्टाने ही याचिका सुनावणीस योग्य मानली. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांच्या वतीने ही याचिका दाखल केली आहे. (Ajmer Dargah)

( हेही वाचा : Dadar Railway स्थानकाच्या ‘या’ फलाट क्रमांकांत पुन्हा बदल

हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता (Vishnu Gupta) यांनी दिवाणी न्यायालयाने अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, दर्गा समिती अजमेर आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाची सुनावणी दि. २० डिसेंबर रोजी होणार आहे. विष्णू गुप्ता यांनी ही याचिका माजी न्यायाधीश हरबिलास सारडा (Herbalist Sarada) यांचे ‘अजमेर: ऐतिहासिक आणि वर्णनात्मक’ या पुस्तकाचा आधार घेतला. तसेच भारतातील सूफीवादाचा इतिहासाचा आधार घेत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. (Ajmer Dargah)

माजी न्यायाधीश हरबिलास सारडा यांच्या ग्रंथानुसार सध्याच्या इमारतीतील ७५ फूट उंच बुलंद दरवाजाच्या बांधकामात मंदिराच्या ढिगाऱ्यांचा उल्लेख केला होता. यात एक तळघर किंवा गर्भगृह आहे, ज्यामध्ये शिवलिंग असल्याचे म्हणटले जात आहे. ग्रंथानुसार या ठिकाणी एक ब्राम्हण कुटुंब पूजा करत होते. दिवाणी न्यायालयात ३८ पानी याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच याचिकेत दर्गा परिसराचे एएसआयकडून सर्वेक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय मध्य प्रदेशातील धार, बनारस आदी ठिकाणच्या भोजशाळांचीही उदाहरणे दिली आहेत. हिंदू सेनेच्या (Hindu Sena) वतीने वकील रामस्वरुप बिश्नोई आणि ईश्वर सिंह यांनी युक्तिवाद केला. (Ajmer Dargah)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.