Paytm Can Add UPI Users : पेटीएमला नवीन युपीआय ग्राहक जोडण्याला परवानगी

Paytm Can Add UPI Users : पेटीएम पेमेंट्स बँकेवर केलेल्या कारवाईनंतर कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. 

90
Paytm Can Add UPI Users : पेटीएमला नवीन युपीआय ग्राहक जोडण्याला परवानगी
  • ऋजुता लुकतुके

पेटीएमला आपल्या युपीआय सेवेचा विस्तार करणं आता शक्य होणार आहे. म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने वन ९७ कम्युनिकेशन्स कंपनीला नवीन युपीआय ग्राहक जोडण्याला परवानगी दिली आहे. फक्त एनसीपीआयचे सगळे नियम आणि अटी सांभाळूनच नवीन ग्राहक कंपनीला जोडता येतील. या वर्षीच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई करताना त्यांचा परवाना काढून घेतला होता. (Paytm Can Add UPI Users)

पेटीएम पेमेंट्स बँक ही वन ९७ कम्युनिकेशन्स कंपनीचीच एक सेवा होती आणि या पेमेंट्स बँकेच्या मार्फत पेटीएमचे युपीआय व्यवहार चालत होते. त्यामुळे युपीआय सेवेवर बडगा उगारला नसला तरी पेटीएम युपीआयलाही त्याचा फटका बसलाच होता. शिवाय नवीन ग्राहक जोडणीलाही स्थगिती मिळाली होती. (Paytm Can Add UPI Users)

(हेही वाचा – UBT ला धक्का; संभाजी ब्रिगेडने सोडली साथ)

आता एनपीसीआयने ही स्थगिती हटवली आहे. त्यामुळे पेटीएम नवीन ग्राहक जोडू शकेल. पेटीएम पेमेंट्स बँकेवरील कारवाई सुरूच आहे. त्यामुळे मधल्या काळात कंपनीने पेटीएमवरील युपीआय व्यवहार सुरू ठेवण्यासाठी मध्यस्थ बँक म्हणून ॲक्सिस बँकेची मदत घेतली होती. त्यानंतर स्टेट बँक, येस बँक आणि एचडीएफसी बँकाही यात जोडल्या गेल्या. (Paytm Can Add UPI Users)

आणि आता पेटीएम युपीआय पूर्वीसारखं सुरू ठेवता येणार आहे. अर्थात, मधल्या घडामोडींनंतर कंपनीच्या युपीआय व्यवसायावर नक्कीच परिणाम झाला आहे. भारतातील युपीआय बाजारपेठेत पेटीएमचा वाटा सध्या ७.९३ टक्के इतकाच उरला आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात हीच हिस्सेदारी १३ टक्के इतकी होती. (Paytm Can Add UPI Users)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.