Parliament Session : रवींद्र वायकरांनी मुंबईकरांच्या प्रश्नांना फोडली वाचा

124
Parliament Session : रवींद्र वायकरांनी मुंबईकरांच्या प्रश्नांना फोडली वाचा

मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांनी फायनान्स बिलावर बोलताना अनेक मागण्या केल्या आहेत. त्यांनी मुंबईकरांचे प्रश्न अतिशय तळमळीने संसदेत मांडले. (Parliament Session)

  • महाराष्ट्राला ७२० किलो मीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. यात रत्नागिरी, दापोली, गुहागर, सिंधुदुर्ग अशा बंदरांचा समावेश आहे. या बंदरांचा विकास करण्यात यावा.
  • जुहू वर्सोवा कोळीवाडा तसेच अन्य ठिकाणी मासेमारी करणाऱ्यांसाठी कल्याणकारी योजना सुरु करण्यात यावी. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना विमा देण्यात येतो त्याप्रमाणे मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांना ही विमा देण्यात यावा.
  • मुंबईत दरदिवशी १ करोड पेक्षा जास्त लोक पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतात. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट आणी रेल्वेच्या पायाभूत सुविधा यांच्या सुधारणा करण्यासाठी एम.यु.टी.पी ला जास्तीत जास्त निधी देण्यात यावा. यासाठी अर्थसंकल्पातून १ कोटी रुपयांचे विशेष अनुदान एम.यु.टी.पी ला देण्यात यावेत. (Parliament Session)
  • मुंबई म्हाडा तसेच एस.आर.ए च्या माध्यमातून लोकांना परवडणारी घरे बांधण्यात येतात. परवडणारी घरे बांधण्यासाठी अर्थसंकल्पात १० लाख कोटींची तरतूद करणात आली आहे. मुंबई हे देशाची आर्थिक व औद्योगिक राजधानी आहे. विविध राज्यातील जनता नोकरी निमित्त मुंबईत येते. मुंबईतील घरांच्या किमती जास्त असल्याने मुंबई घर घेणे या लोकांना जमत नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांना झोपड्यांमध्ये राहवे लागते. यामुळे झोपड्यांचेप्रमाण वाढत आहे. बजेटमध्ये यासाठी १० लाख कोटींची तरतूद केली आहे त्यातील १ लाख कोटी मुंबई शहराच्या विकासासाठी देण्यात यावे.
  • कॅन्सर रुग्णावर उपचारासाठी टाटाचे एकमेव रुग्णालय आहे. राज्याच्या विविध भागातून कॅन्सर रुग्ण येथे उपचारासाठी येतात. त्यामुळे या रुग्णालयावर जास्त प्रमाणात भर पडतो. हा भार कमी करण्यासाठी आरे मधील जमिनीचे सर्वेक्षण करून सरकारी कॅन्सर रुग्णालय उभारण्यात यावे. (Parliament Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.