Ganeshotsav 2023 : डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने ऑनलाईन व ऑफलाईन स्पर्धेचे आयोजन

''उत्सव बाप्पाचा... वारसा संस्कृतीचा” हे घोषवाक्य घेऊन ''गणेशोत्सव स्पर्धा-२०२३'' चे आयोजन करण्यात आले आहे.

19
Ganeshotsav 2023 : डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने ऑनलाईन व ऑफलाईन स्पर्धेचे आयोजन
Ganeshotsav 2023 : डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने ऑनलाईन व ऑफलाईन स्पर्धेचे आयोजन

गणेशोत्सव म्हणजे उत्साहाचा, आनंदाचा आणि सकारात्मक ऊर्जा देणारा परिपूर्ण उत्सव. गणेशोत्सवाची आपण सारे जण संबंध वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. ‘पहा झाले पुरे एक वर्ष-वर्षाने एकदा हर्ष’ अशा अजरामर गाण्यांचे सूर कानी पडू लागतात आणि गणेशोत्सवाची सर्वत्र लगबग सुरु होते.

कौटुंबिक स्तरावर आणि सार्वजनिक मंडळांकडून मोठ्या उत्साहात आपण आपल्या बाप्पाची मनोभावे सेवा-आराधना करतो. या उत्सवाचा आनंद हा शब्दांमध्ये मांडणे जरा कसरतीचेच.. या उत्सवादरम्यान माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व गणेशभक्तांचा आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने ”उत्सव बाप्पाचा… वारसा संस्कृतीचा” हे घोषवाक्य घेऊन ”गणेशोत्सव स्पर्धा – २०२३” चे आयोजन करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Ind vs SL Asia Cup Final : अक्षर पटेल जायबंदी झाल्याने वॉशिंग्टन सुंदरला पाचारण)

घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन विभागांमध्ये ही स्पर्धा होईल. परंपरा आणि आधुनिकतेची जोड देत सर्व नागरिकांसाठी या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत नागरिकांनी आवर्जून सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.