Operation Muskan-13 ही विशेष मोहीम १ ते ३० डिसेंबर या कालावधीत राबवली जाणार

83
Operation Muskan-13 ही विशेष मोहीम १ ते ३० डिसेंबर या कालावधीत राबवली जाणार

राज्याच्या वेगवेगळ्या शहरातून बेपत्ता झालेली मुले, तसेच महिलांच्या शोधासाठी पोलिसांकडून ‘ऑपरेशन मुस्कान-१३’ ही विशेष मोहीम १ ते ३० डिसेंबर या कालावधीत राबविली जाणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, तसेच सर्व पोलीस ठाण्यांमध्ये विशेष पथकाची स्थापना करण्यात येणार आहे. (Operation Muskan-13)

(हेही वाचा – Goregaon Mulund Link Road प्रकल्पातील बोगदा कामाचे थर्ड पार्टी ऑडीट करणार व्हीजेटीआय मुंबई)

या पथकाच्या माध्यमातून शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक सहायक निरीक्षक, तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश राहणार आहे. या मोहिमेतंर्गत पुणे शहर, तसेच परिसरातून बेपत्ताा झालेली मुले, तसेच तरुणींचा शोध घेण्यात येणार आहे. ‘ऑपरेशन मुस्कान-१३’ ही राज्यभरातील अल्पवयीन मुले आणि १८ वर्षांवरील महिलांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेला एक प्रभावी उपक्रम आहे. (Operation Muskan-13)

(हेही वाचा – प्रत्येक भूमीवर हिंदूंचा अधिकार; आमदार Nitesh Rane यांचे वक्तव्य)

पुणे शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. एरवी शहरातून बेपत्ता झालेली लहान मुले, महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येतात. बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी २४ तास आणि ३६५ दिवस प्राधान्य देण्यात आले आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. (Operation Muskan-13)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.