Om Certificate : छत्रपती शिवाजी महाराजांची नीती वापरा; श्रद्धेचे युद्ध श्रद्धेने लढूया – रणजीत सावरकर

206
Om Certificate : छत्रपती शिवाजी महाराजांची नीती वापरा; श्रद्धेचे युद्ध श्रद्धेने लढूया - रणजीत सावरकर
Om Certificate : छत्रपती शिवाजी महाराजांची नीती वापरा; श्रद्धेचे युद्ध श्रद्धेने लढूया - रणजीत सावरकर

“महाराष्ट्रावर किंवा भारतावर पुन्हा मोघालाई येण्याचा प्रचंड धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नुसतं ‘शिवाजी महाराज की जय’ बोलून चालणार नाही, तर वेळीच जागे व्हा, शिवाजी महाराजांची नीती वापरा. आर्थिक युद्ध आर्थिक नीतीने लढले पाहिजे आणि श्रद्धेचे युद्ध त्याच पद्धतीने लढले पाहिजे. त्यासाठीच ‘ओम प्रमाणपत्र’ (Om Certificate) मोहीम सुरू केली आहे. आपण सगळे शिवरायांचे मावळे आहात, कर्तृत्ववान आहात त्यामुळे या प्रमाणपत्र वितरण मोहिमेत सहभागी व्हा,” असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर (Ranjit Savarkar) यांनी रविवारी २८ जुलै रोजी केले.

श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडच्या वतीने ‘जागर शिवराज्याभिषेकाचा सन्मान शिवसमिधांचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवराज्याभिषेक समितीच्या सर्व सदस्यांचा सन्मान २८ जुलै रोजी करण्यात आला. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथील सभागृहात संपन्न झालेल्या या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांचा शिवसन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. या वेळी व्यासपिठावर ज्येष्ठ नाणीसंकलक अशोकसिंह ठाकूर, स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, बडोदा संस्थानचे वंशज डॉ. हेमंत राजे गायकवाड, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नात असीलता राजे, तसेच श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार हे मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

(हेही वाचा – Award Ceremony : ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांचा शिवसन्मान पुरस्काराने गौरव)

पादशहांनी बलाढ्य विजय नगरला संपवलं

“विजय नगरसारख्या बलाढ्य साम्राज्याला पाच पादशहांनी संपवलं. विजय नगरने या प्रत्येक पादशहाचा वेगवेगळा पराभव केला होता. पण काळ जसजसा जातो तसे आपण हिंदू निर्धास्त होतो, निष्क्रियतेत जातो. त्या पाच पादशहांनी एक होऊन बलाढ्य, संपन्न अशा विजय नगरला संपवलं. शिवाजी महाराजांनी हा इतिहास वाचला होता, अभ्यासाला होता, त्यामुळे आपण  ‘शिवाजी महाराज की जय’ म्हणतो तेव्हा त्यांची नीतीही आचरणात आणायला हवी,” असे सावरकर यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र, भारतावर मोघलाईचा धोका

“विजय नगरसारखी परिस्थिती आज आपल्या देशाची झाली आहे,” असे सांगतानाच, “आज आपण बलाढ्य, संपन्न आहोत पण परिस्थिति पुन्हा वाईट झाली आहे. आता आपण झोपलो तर मोघलाई महाराष्ट्र, भारतावर येण्याचा धोका आहे. महाराजांच्या काळात श्रद्धेवर हल्ला होत असे. कारण श्रद्धा संपली की शक्ति संपते,” असे सावरकर म्हणाले. “महाराष्ट्रात मंदिराबाहेर जे पेढे, प्रसाद मिळतात, ते गाईची चरबी वापरुन बनवले जातात. श्रद्धास्थाने संपवण्याचे हे कट-कारस्थान आहे आणि त्यामुळे श्रध्द्धेवरील महाराजांची पद्धत वापरायला हवी.”

(हेही वाचा – Award Ceremony : ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर यांचा मराठा तलवार देऊन विशेष सन्मान)

आपण शिवरायांचे मावळे, सहभागी व्हा

“ओम प्रमाणपात्रांची ‘वॉलंटियर असिस्ट व्हर्जन’ उद्या येईल. या कामासाठी कार्यकर्त्यांची गरज आहे, हिंदू धार्मिकस्थळांच्या बाहेर पेढे, प्रसाद विक्रेते असतात त्यांच्याकडून फॉर्म भरून तत्काळ त्यांना ‘ओम प्रमाणपत्र’ (Om Certificate) वितरित करतील. आपण सगळे शिवरायांचे मावळे आहात, कर्तृत्ववान आहात. यात सहभागी व्हा,” असे आवाहन सावरकर यांनी केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.