NPS Vatsalya : एनपीएस वात्सल्य योजनेसाठी अर्ज कसा करायचा? काय आहेत फायदे?

NPS Vatsalya : यावर्षी अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या योजनेची घोषणा केली होती.

276
NPS Vatsalya : एनपीएस वात्सल्य योजनेसाठी अर्ज कसा करायचा? काय आहेत फायदे?
  • ऋजुता लुकतुके

एनपीएस वात्सल्य या योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अलीकडेच अर्थसंकल्प मांडताना केली होती. त्यांच्याच हस्ते या आठवड्यात योजनेचा शुभारंभ झाला आहे. योजना सुरु झाल्यानंतर शुक्रवारी पहिल्याच दिवशी ९,७०५ खाती या योजने अंतर्गत सुरू करण्यात आली. ही योजना नेमकी काय आहे आणि त्याचा फायदा काय आहे, ते समजून घेऊया.

नावाप्रमाणेच एनपीएस म्हणजे ही राष्ट्रीय पेन्शन योजना आहे. पण, यात गुंतवणूकदार आपल्या १८ वर्षांखालील मुलगा किंवा मुलीसाठी त्यांच्या नावावर गुंतवणूक करत असतो. त्यामुळे तुमच्या मुलांच्या भविष्यनिर्वाहाची सोय एकप्रकारे तुम्ही करून देत असता. मूल १८ वर्षांचं झालं की, वात्सल्य एनपीएस खातं नियमित होऊ शकतं. शिवाय गुंतवणुकीचे कर बचतीचे फायदेही गुंतवणूकदाराला मिळत राहतात. (NPS Vatsalya)

(हेही वाचा – Haryana Assembly Election : कुमारी सेलजा यांना निवडणुकीत काँग्रेसने केले बाजूला)

आता सविस्तर ही योजना समजून घेऊया

राष्ट्रीय पेन्शन योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत पेन्शन योजना आहे. निवृत्तीनंतरच्या आयुष्याची तरतूद करण्यासाठी ही योजना २००४ मध्ये सरकारने सुरू केली. आता अगदी लहानपणापासून मुलांमध्ये बचत आणि गुंतवणुकीचं महत्त्व रुजावं यासाठी सरकारने या योजनेची व्याप्ती वाढवून एनपीएस वात्सल्य नावाने १८ वर्षांखालील मुलांसाठी एनपीएस योजना सुरू केली आहे. अगदी ५०० रुपयांपासून यात गुंतवणूक करता येते. या योजने केलेल्या गुंतवणुकीवर आणि जमा झालेल्या निधीवर कर लागत नाही. मूल १८ वर्षांचं झाल्यावर वात्सल्य खातं नियमित एनपीएस खात्यात परिवर्तित होतं. (NPS Vatsalya)

(हेही वाचा – Senate Election 2024 : मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका; मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीवरील स्थगिती उठवली)

एनपीएस वात्सल्यचे फायदे 
  • मुलांच्या भविष्यासाठी अगदी लहान वयातच बचतीला सुरुवात होते
  • दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीमुळे कम्पाऊंडिंगचा फायदा मिळतो आणि पैसे वाढतात
  • नियमित एनपीएस योजनेला मिळणारे कर बचतीचे फायदे या योजनेतही मिळतात
  • मूल १८ वर्षांचं झाल्यावर एनपीएस खातं नियमित एनपीएस खात्यात परिवर्तित होतं
  • मुलांना अर्थविषयक ज्जान लहान वयात मिळतं.
  • अगदी महिना ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते

(हेही वाचा – Atishi CM Oath Ceremony : आतिशी दिल्लीच्या ८व्या मुख्यमंत्री; एलजी यांनी ५ मंत्र्यांना शपथ दिली)

एनपीएस योजनेच्या वेबसाईटवर जाऊन वात्सल्य योजनेसाठी अर्ज करता येतो. नोंदणी करताना एनपीएस वात्सल्य (मायनर) हा टॅब निवडायचा आहे. पालकाची जन्मतारीख, पॅन क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल लिहिल्यावर प्रत्यक्ष नोंदणी सुरू होईल. पुढे खातेधारकाचा तपशील (इथे तुमच्या मुलाची माहिती) द्यायचा आहे. त्याबरोबर आवश्यक कागदपत्र ऑनलाईन अपलोड केली की, योजनेसाठीची नोंदणी पूर्ण होईल. तुम्हाला एकदा ओटीपी व्हेरिफिकेशन सुरुवातीला करावं लागेल. एनपीएस वात्सल्यमध्ये तुम्हाला पहिल्यांदा १००० रुपयांपासून सुरूवात करावी लागेल. ही नोंदणी करताना खातेधारकाच्या नावाचा पीआरएएन क्रमांक बनेल, जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि त्यांची नोंद घ्यायची आहे. (NPS Vatsalya)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.