- ऋजुता लुकतुके
हल्ली जगभरात कुठेही एखादी जगावेगळी, मजेशीर किंवा विचित्र घटना घडली असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ती लगेच व्हायरल होते. असंच काहीसं घडलं आहे एका अमेरिकन कंपनीच्या बाबतीत. या कंपनीत काम करणाऱ्या एका प्रशिक्षणार्थीने एका तासात आपल्याला कामावरून काढून टाकल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकली. ही पोस्ट तर व्हायरल झालीच. पण, त्यातून बाहेर आलं एक विचित्र सत्य. त्या कंपनी मालकाने केवळ एका मिटिंगला गैरहजर राहिले म्हणून फक्त या प्रशिक्षणार्थींलाच नाही तर इतर ९८ जणांना कामावरून काढून टाकलं आहे. टक्केवारीत सांगायचं तर ९० टक्के कर्मचारी एका तासात बेरोजगार झाले आहेत. (No Meeting, No Job)
(हेही वाचा – Dnyanesh Maharao यांना तात्काळ अटक करा, अन्यथा अवमान याचिका दाखल करू; प्रसाद पंडित यांचा इशारा)
इतर कंपन्यांप्रमाणेच दिवसाच्या सुरुवातीला एक बैठक घेण्याचा या कंपनीत शिरस्ता होता. कंपनीच्या सीईओने तशी मिटींग घेतली. या मिटींगमध्ये जवळपास ९०% टक्के कर्मचारी गैरहजर होते. ११० पैकी केवळ ११ जणांची मिटिंगला ऑनलाईन उपस्थिती होती. याच गोष्टीचा राग मालकाला आला. या मिटिंगला गैरहजर राहण्याचं धाडस ज्या कर्मचाऱ्यांनी केलं त्यांना त्वरित नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं. सकाळच्या मिटींगला उपस्थित न राहण्याची चांगलीच किंमत कर्मचाऱ्यांना मोजावी लागली. (No Meeting, No Job)
(हेही वाचा – राहुल गांधी, खरगे आणि सुप्रिया श्रीनेट यांच्या विरोधात १०० कोटींचा दावा ठोकणार; Vinod Tawde यांचा इशारा)
चिडलेल्या सीईओने सर्व गैरहजर कर्मचाऱ्यांना संदेश धाडले. तुम्ही कंपनीच्या नियमांचं उल्लंघन केलं आणि तुमच्यात कामाप्रती अजिबात गांभीर्य नाही, असा संदेश धाडत रागवलेल्या बॉसने ९९ कर्मचाऱ्यांना काढून टाकलं. रागवलेल्या बॉसनं म्हटलं, “तुम्ही मान्य केलेले कंपनीचे नियम तुम्ही पाळलेले नाहीत. कृपया कंपनीच्या मालकीचे सर्व साहित्य परत करा, सर्व खात्यांमधून साइन आउट करा आणि या ताबडतोब तुमचा राजीनामा सोपावा. मी तुम्हाला तुमचं जीवन अधिक चांगलं करण्याची संधी दिली आहे, पुढे कठोर परिश्रम करा आणि यशस्वी बना. तुम्ही कंपनीला गांभीर्याने घेत नाहीत, हे तुम्ही मला दाखवून दिलं आहे. आज सकाळी ११० लोकांपैकी फक्त ११ लोक मिटिंगला उपस्थित होते. उपस्थित ११ सोडले तर बाकी सर्वांना नोकरीतून काढून टाकण्यात येत आहे.” बॉसने पाठवलेल्या या पत्राचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट झाल्या झाल्या या बॉसवर टीकेची एकच झोत उठली आहे. या प्रशिक्षणार्थीने म्हटलं की, नोकरीवर रुजू झाल्यानंतर तासाभरातच त्याला काढून टाकण्यात आलं. (No Meeting, No Job)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community