NMMS Exam : ‘एनएमएमएस’ परीक्षा ‘या’ तारखेला होणार

120
NMMS Exam : ‘एनएमएमएस’ परीक्षा 'या' तारखेला होणार

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा’ (एनएमएमएस) २२ डिसेंबरला होणार आहे. शिष्यवृत्तीसाठी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in आणि https://mscenmms.in या संकेतस्थळावर शाळांना ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (NMMS Exam)

(हेही वाचा – Mumbai Metro Line 03 : मुंबईकरांसाठी खुशखबर! अखेर बहुप्रतीक्षित भुयारी मेट्रो ०३ प्रवाशांच्या सेवेत  )

या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी २०२५ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. इयत्ता आठवीच्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक साहाय्य करावे, यासाठी २००७-०८ पासून ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे. (NMMS Exam)

(हेही वाचा – Mumbai Fire News : माहीम परिसरात रहिवासी इमारतीला आग ; जीवितहानी टळली     )

याअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपये (वार्षिक १२ हजार रुपये) शिष्यवृत्ती देण्यात येते. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. आर्थिक दुर्बल घटकातील पालकांचे उत्पन्न तीन लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी आहे, त्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. (NMMS Exam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.