New Delhi: एसीचे आउटडोर यूनिट डोक्यावर पडल्याने तरुण जागीच ठार, व्हिडीओ व्हायरल

213
New Delhi: एसीचे आउटडोर यूनिट डोक्यावर पडल्याने तरुण जागीच ठार, व्हिडीओ व्हायरल
New Delhi: एसीचे आउटडोर यूनिट डोक्यावर पडल्याने तरुण जागीच ठार, व्हिडीओ व्हायरल

दिल्लीतील (New Delhi) करोल बाग भागात एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून एअर कंडिशनर युनिट पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. बिल्डिंगच्या खाली एक मुलगा स्कूटरवर बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्या शेजारी त्याचा एक मित्र उभा होता. दोघे बोलत होते. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर अचानक एसीचे आऊटडोअर युनिट तरुणाच्या डोक्यावर पडले.

(हेही वाचा –Rahul Gandhi यांना होणार का २ वर्षांचा तुरुंगवास ? पुणे सत्र न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष)

या अपघातात दोन्ही मित्र जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर स्कूटरवरील तरुणाला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या मित्राच्या हाताला दुखापत झाली आहे. जितेश चड्ढा (18 वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र प्रांशु (17 वर्षे) हा पटेल नगर येथील रहिवासी आहे. (New Delhi)

(हेही वाचा –महाराष्ट्रातील निवडणुकांविषयी Supriya Sule यांचे सरकारवर आरोप; म्हणतात…)

अपघातानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एसी पडण्याचे कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीम तैनात करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. (New Delhi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.