Nepal Helicopter Crash: नेपाळमधील नुवाकोट येथे हेलिकॉप्टर कोसळले, ४ प्रवाशांचा मृत्यू

122
Nepal Helicopter Crash: नेपाळमधील नुवाकोट येथे हेलिकॉप्टर कोसळले, ४ प्रवाशांचा मृत्यू
Nepal Helicopter Crash: नेपाळमधील नुवाकोट येथे हेलिकॉप्टर कोसळले, ४ प्रवाशांचा मृत्यू

नेपाळमधील नुवाकोटमध्ये (Nepal Nuwakot) हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. यामध्ये ४ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रसुवा येथे जाणाऱ्या या हेलिकॉप्टरमध्ये पाच जण होते, असे सांगण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चार चिनी नागरिकांचाही समावेश होता. दरम्यान २४ जुलै रोजी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Tribhuvan International Airport) विमान कोसळल्याची ही घटना घडली होती. त्यात १८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. (Nepal Helicopter Crash)

(हेही वाचा – Love Jihad : धर्मांध वासीफच्‍या छळाला कंटाळून हिंदु युवतीची आत्‍महत्‍या)

ही घटना बुधवारी (७ ऑगस्ट) घडल्याचे सांगण्यात येत आहे. नेपाळमधील नुवाकोटमधील शिवपुरी भागात हा हेलिकॉप्टर अपघात झाला. त्यात एअर डायनेस्टीचे कंपणीचे हेलिकॉप्टर (Air Dynasty Helicopter Company) कोसळले आणि त्यात चार जणांचा मृत्यू झाला. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका सूत्राने हिमालयन टाईम्सला सांगितले की, हेलिकॉप्टर काठमांडूहून निघाले होते आणि स्याफ्रॉबेन्सीकडे जात असताना ते क्रॅश (Helicopter Crash) झाले.  (Nepal Helicopter Crash)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.