Nepal Accident Bus: नेपाळ दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

99
Nepal Accident Bus: नेपाळ दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
Nepal Accident Bus: नेपाळ दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

नेपाळ येथील बस दुर्घटनेत २६ जणांचा मृत्यू झाला असून, काठमांडू येथे देवदर्शनासाठी जात असताना भाविकांची बस दरीत कोसळली होती. बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. त्यानंतर अपघातातील मृतांवर जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तलवेळ, सुश्री गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. (Nepal Accident Bus)

(हेही वाचा – Kolkata Rape Case : आर. जी. कर कॉलेजच्या माजी प्राचार्यांच्या घरी सीबीआयची धाड)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi, Jalgaon) यांच्या उपस्थितीत जळगावमध्ये रविवारी (२५ ऑगस्ट) ‘लखपती दीदी’चा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला. तसेच नेपाळ येथील बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची घोषणा केली.

दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीही नेपाळ येथील बस अपघातात मृत झालेल्याच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत केंद्र सरकारतर्फे करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. यानंतर राज्य सरकारने देखील मदत जाहीर केली आहे. जळगाव जिल्ह्यातील वरणगाव, तळवेल परिसरातील ८० भाविकांचा समूह देवदर्शनासाठी गेले होते. या दरम्यान ते नेपाळला गेले असता शुक्रवारी (२३ ऑगस्ट) भाविकांच्या एका बसला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये जळगाव जिल्ह्यातील तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला. तर अपघातात जखमी झालेल्या काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.