RBI Security : आरबीआयच्या सुरक्षेत निष्काळजीपणा, ११ पोलिस कॉन्स्टेबलसह कारकून निलंबित

735
RBI Security : आरबीआयच्या सुरक्षेत निष्काळजीपणा, ११ पोलिस कॉन्स्टेबलसह कारकून निलंबित

देशाची सर्वोच्च बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयात तैनात असलेले जवळपास १४ पोलिस एकाच वेळी गैरहजर राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पोलिसांनी ड्युटी वाटप करणाऱ्या कारकुनाच्या संगनमताने त्यांनी भरपगारी सुट्टी घेतली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित कारकुनासोबतच ११ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. आरबीआयची सुरक्षा (RBI Security) धोक्यात टाकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 

(हेही वाचा – Sanjay Raut यांना 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा; काय आहे प्रकरण ?)

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला. तसेच इतर पोलिस कर्मचाऱ्यांना काम सोपवण्याची जबाबदारी असलेल्या कारकूनालाही शिक्षा देण्यात आली. भारताच्या मध्यवर्ती बँकेच्या सुरक्षेला धोका निर्माण करून स्वतःच्या फायद्यासाठी हे गैरवर्तन लपवल्याबद्दल ही शिक्षा ठोठावण्यात आली. पोलीस उपायुक्तांनी १२ जणांना निलंबित करण्यात आल्याची पुष्टी केली. मात्र, त्यांनी या संदर्भात अधिक तपशील सांगण्यास नकार दिला. (RBI Security)

(हेही वाचा – Chess Olympiad : बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेता विदित पंतप्रधानांच्या भेटीसाठी अझरबैजानहून परतला )

कारकून आणि गैरहजर पोलिसांचे लागेबांधे

पोलिस न सांगता गैरहजर असल्याची गंभीर बाब समोर येताच ताडदेव येथील सशस्त्र विभागातील अधिकाऱ्याने सखोल चौकशी केली असता ड्युटी वाटप करणारा कारकून आणि गैरहजर पोलिसांचे लागेबांधे समोर आले. त्याने स्वतःच्या फायद्यासाठी या पोलिसांची हजेरी लावत विनापरवानगी गैरहजर राहण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले. पोलिस उपायुक्तांनी याप्रकरणाची सहायक पोलिस निरीक्षकांमार्फत विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच ११ पोलिस कॉन्स्टेबलसह बारा जणांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात हलगर्जी आणि निष्काळजीपणाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच त्यांच्या खात्यांतर्गत चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. (RBI Security)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.