Navi Mumbai Airport चे काम प्रगतीपथावर; सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज

115
Navi Mumbai Airport चे काम प्रगतीपथावर; सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज
Navi Mumbai Airport चे काम प्रगतीपथावर; सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा व्यावसायिक वापरासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत खुला करण्याचे सिडकोचे नियोजन आहे. सध्या धावपट्टीचे काम पूर्ण झाले असून, टर्मिनल इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. त्यानुसार विमानतळाच्या परिचलनासाठी महत्त्वाची मानली जाणारी इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम चाचणी ऑगस्ट महिन्यात पूर्ण झाली आहे. आता विमानतळावर प्रत्यक्ष विमानाचे लँडिंग केले जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Navi Mumbai Airport) सुखोईच्या (Sukhoi) उड्डाणाची लवकरच चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी सिडको आणि संबंधित यंत्रणा सज्ज आहेत. नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमान प्राधिकरणाची अनुमती आवश्यक आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच संबंधित विभागांना पत्रे पाठविली आहेत, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

(हेही वाचा – Versova Assembly Constituency : वर्सोव्यात विद्यमान आमदारांची वाट बिकट)

सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी मंगळवार, २४ सप्टेंबर रोजी प्रकल्पाचा पाहणी दौरा केल्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुखोईचे लँडिंग होईल, असे सुतोवाच केले होते. या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमान प्राधिकरणाकडे यापूर्वीच पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाने होकार दर्शविल्यास कोणत्याही क्षणी सुखोईची लँडिंग चाचणी करणे शक्य होणार आहे. यासंदर्भातील वृत्त दैनिक ‘लोकमत’ने दिले आहे.

कसे असेल नवे विमानतळ ?

नवी मुंबई विमानतळ पाच टप्प्यांत उभारले जाणार आहे. टप्पा क्रमांक १ आणि २ एकत्रित पूर्ण केले जाणार आहेत. यात एक टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत हा टप्पा व्यावसायिक वापरासाठी खुला होईल. या अंतर्गत दोन कोटी प्रवासी प्रवास करू शकतील, असा अंदाज आहे. टप्पा क्रमांक ३, ४ आणि ५ मध्ये तीन टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. या टप्प्यानंतर वार्षिक ९ कोटी प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.