Navaratri Durga Idol : काँग्रेसप्रणित राज्यात हिंदूंच्या धार्मिक प्रतिकांवर हल्ला, अज्ञातांकडून दुर्गामातेच्या मूर्तीची विटंबना

228
Navaratri Durga Idol : काँग्रेसप्रणित राज्यात हिंदूंच्या धार्मिक प्रतिकांवर हल्ला, अज्ञातांकडून दुर्गामातेच्या मूर्तीची विटंबना
Navaratri Durga Idol : काँग्रेसप्रणित राज्यात हिंदूंच्या धार्मिक प्रतिकांवर हल्ला, अज्ञातांकडून दुर्गामातेच्या मूर्तीची विटंबना

हैदराबादच्या (Hyderabad) नामपल्ली मैदानावर दुर्गा मातेच्या मूर्तीची (Navaratri Durga Idol) तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. ही घटना दि. १० ऑक्टोबर रोजी घडली. या मूर्तींची स्थापना (Navaratri Durga Idol) एग्जीबेशन सोसायटीच्या माध्यमातून दरवर्षी केली जाते. हे शहरातील प्रमुख धार्मिक आयोजनांपैकी एक आहे.

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, नामपल्ली एग्जीबेशन ग्राऊंडवर (Nampally Exhibition Ground) ही घटना घडताच बेगम बाजार पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांची एक टीम लगेच घटनास्थळी दाखल झाली. एसीपी चंद्रशेखर यांनी सांगितले की, या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिस त्यादिवशीचा गरबा समाप्त होईपर्यंत घटनास्थळी उपस्थित होते. याप्रकरणी स्थानिक नागरिक आणि भक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

( हेही वाचा : Mukesh Ambani : फोर्ब्सच्या श्रीमंत भारतीयांच्या यादीत मुकेश अंबानीच अव्वल 

पोलिस इन्स्पेक्टर विजय यांनी एएनआयला माहिती देताना सांगितले की, काही अज्ञाच व्यक्तींनी नामपल्ली एग्जीबेशन ग्राऊंडवरील (Nampally Exhibition Ground) दुर्गा मातेच्या मंडपातील दानपेटी हटवली आहे. तसेच दुर्गा मातेच्या मूर्तीचे (Navaratri Durga Idol) हात तुटलेल्या आहेत. आयोजकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

दरम्यान या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी ट्वीट केले की, नामपल्ली एग्जीबेशन ग्राऊंडवरील (Nampally Exhibition Ground) दुर्गा मातेच्या मूर्तीची (Navaratri Durga Idol) तोडफोड करण्यात आली आहे. बेगम बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा परिसर येतो. जेव्हा मी भाग्यलक्ष्मी मंदिरासाठी ट्विटवर आवाज उठवला तेव्हा मला नोटीस पाठवण्यात आली आणि माझे ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्यात आले. मात्र मी मागे हटणार नाही. हे भाग्यनगर आहे , पाकिस्तान नाही. इथे असे कृत्य घडणे ही निंदनीय आहे, असे ही अग्रवाल यांनी सांगितले. तसेच दोन वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये कट्टरपंथी महिलांकडून दुर्गा मातेच्या मूर्तीची (Navaratri Durga Idol) विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर दोन कट्टरपंथी महिलांवर कारवाईही करण्यात आली होती.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.