National Teacher Award 2024 : महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

राष्ट्रपती यांच्या हस्ते 82 शिक्षकांना विशेष योगदानाबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

136
National Teacher Award 2024 : महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
  • प्रतिनिधी

शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी तसेच माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने (National Teacher Award 2024) गुरुवारी (५ सप्टेंबर) सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक मोबाईल ऍप, उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामुग्री निर्मिती, दृश्य व श्राव्य सामुग्री निर्मिती, संगणक, दूरचित्रवणी, यु-ट्युब, आकाशवाणी, सॉफ्टवेयर, हार्डवेयर आदिंचा उपयोग करून शालेय शिक्षण सुलभ, गुणात्मक आणि संशोधनात्मक बनविणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या (National Teacher Award 2024) निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी, सुकन्या मुजुमदार यासह वर‍िष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी, महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि कौशल्य कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष 2024 चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ (National Teacher Award 2024) प्रदान करण्यात आले. शालेय विभागात गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके तर कोल्हापूरच्या एस. एम. लोहिया हायस्मेल अँड ज्युनिअर कॉलेजमधील चित्रकला शिक्षक सागर बागडे, तर उच्च शिक्षण विभागात पुण्यातील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका प्रा. डॉ. शिल्पागिरी प्रसाद गणपुले, आयआयएसइआर पुणे संस्थेतील प्रा. श्रीनिवास होथा तसेच भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्रालयातंर्गत आयटीआय निदेशक विवेक चांदलिया या शिक्षकांचा समावेश आहे.

(हेही वाचा – Bihar : नितीश कुमार, तेजस्वी यादव भेटीमुळे भाजपा अस्वस्थ)

मंतैय्या बेडके

मंतैय्या बेडके या उपक्रमशील शिक्षक यांना 2024 वर्षाचा शालेय शिक्षण विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (National Teachers’ Award 2024) प्रदान करण्यात आला. भारतातून 50 शिक्षकांची तर महाराष्ट्रातून दोन शिक्षिकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. बेडके यांनी गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागात उत्कृष्ट कार्य करत शाळेची पटसंख्या 8 वरून 138 पर्यंत वाढवली आहे. त्यांनी

लोकसहभागातून शाळेत स्मार्ट टीव्ही आणि इन्व्हर्टरसारख्या सुविधा उभारल्या आहेत. त्यांच्या अथक मेहनतीने आणि समर्पणाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श निर्माण केला आहे.

(हेही वाचा – Shiv Sena UBT सांगलीच्या विश्वजित कदमांचा करणार किरीट सोमय्या?)

सागर बागडे

सागर बागडे या उपक्रमशील शिक्षक यांना 2024 वर्षाचा शालेय शिक्षण विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (National Teachers’ Award 2024) प्रदान करण्यात आला. गेल्या 30 वर्षांपासून कोल्हापूरच्या एस. एम. लोहिया हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचा गौरव असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत देश-विदेशात कार्यक्रम करून दोन विश्वविक्रमही नोंदवले आहेत.

विवेक चांदलिया

कोल्हापूर जिल्ह्याचे चित्रकार आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिल्प निर्देशक विवेक चिमन चांदलिया यांना हस्तकला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्रालयातंर्गत आयटीआय निदेशकांसाठीचा 2024 मधील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. आतापर्यंत पेंर्टिग आणि स्प्रे चित्रकला या कला क्षेत्रात 500 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे.

(हेही वाचा – Madrasa : बनावट नोटा छापल्या जाणाऱ्या मदरसावर फिरणार बुलडोझर)

प्रा. डॉ. शिल्पागौरी प्रसाद गणपुले

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय,(Akurdi) आकुर्डी, पुणे येथील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका प्रा. डॉ. शिल्पागौरी प्रसाद गणपुले यांना उच्च शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन या विभागाच्या अंतर्गत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. प्रा डॉ. शिल्पागौरी प्रसाद गणपुले ह्या गेल्या 30 वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषद आणि मानव्य विद्या शाखेच्या सदस्य म्हणून काम केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त 10 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांना उत्कृष्ट अध्यापक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. प्रा. डॉ. गणपुले यांनी 12 हून अधिक देशांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. तसेच त्यांनी 7 पुस्तकांचे लेखन, 14 पुस्तकांचे संकलन व 3 पुस्तकांचे भाषांतर केले आहे. प्रो. डॉ. गणपुले यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत 14 विद्यार्थ्यांनी पी. एच. डी. आणि एम. फिल पूर्ण केले आहे.

प्रा. श्रीनिवास होथा

प्रा. श्रीनिवास होथा हे कार्बोहायड्रेट रसायनशास्त्रातील नामांकित संशोधक असून, त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी देश-विदेशात प्रसिद्ध आहेत. आंध्र प्रदेशात जन्मलेल्या होथा यांनी आंध्र विश्वविद्यालयातून बी. एससी. केली व पुढे त्यांनी न्यूयॉर्कच्या रॉकफेलर विद्यापीठात पोस्टडॉक्टोरल अभ्यास करून देशात परतले आणि भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांच्या संशोधनात कार्बोहायड्रेट रसायनशास्त्रातील महत्त्वपूर्ण योगदान असून, त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Telangana Naxals Encounter: तेलंगणामध्ये सुरक्षा दलाकडून ६ नक्षलवाद्यांना कंठस्नान )

कठोर आणि पारदर्शक निवड प्रक्रियेव्दारे निवडलेल्या देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी दरवर्षी शिक्षक दिन म्हणून राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम संपूर्ण भारतात आयोजित केला जातो. देशातील शिक्षकांच्या अव्दितीय योगदानाचा गौरव करणे व ज्या शिक्षकांनी आपल्या निष्ठेने आणि समिर्पित वृत्तीने केवळ शैक्षणिक गुणवत्ता सुधारली नाही, तर त्यांच्या विद्यार्थ्यांचे जीवन समृध्द केले आहे, त्यांचा सन्मान करणे हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारचा उद्देश आहे.

या वर्षापासून, राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची व्याप्ती वाढवून उच्च शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या शिक्षकांचाही यात समावेश करण्यात आला आहे. यावर्षी 50 शालेय शिक्षक, उच्च शिक्षण विभागातील 16 शिक्षक आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या 16 शिक्षकांचा या पुरस्काराने पुरस्कृत केले आहे. गुणवत्तेचे प्रमाणपत्र, 50,000 रुपये आणि एक पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.