Navi Mumbai Airport ला दि. बा. पाटील यांचे नाव द्या; रविंद्र वायकरांनी लोकसभेत केली मागणी

107
Navi Mumbai Airport ला दि. बा. पाटील यांचे नाव द्या; रविंद्र वायकरांनी लोकसभेत केली मागणी
  • मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत नागरी उड्डयन मंत्री यांच्याकडे केली मागणी.
  • रत्नागिरी व चिपी विमानतळाचाही विकास करण्याची मागणी.
  • पायाभूत सुविधेसाठी ठेवण्यात आलेल्या निधी पैकी १ लाख कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी.
  • सांताक्रूझ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील झोपडपट्टीचा विकास करून त्याठिकाणी अतिरिक्त रनवे तयार करा.

(हेही वाचा – काँग्रेसची हुजरेगिरी करूनही उद्धव ठाकरेंना काहीच मिळाले नाही : Keshav Upadhye)

मुंबई एअरपोर्टवरील (Navi Mumbai Airport) विमानांचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन एअरपोर्टला दि. बा. पाटील असे नाव देण्याची जी जनतेची मागणी आहे ती पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत केली. भारतीय आर्युमान विधेयक २०२४ वर बोलताना वायकर यांनी ही मागणी केली.

नवी मुंबई येथे नवीन एअरपोर्ट (Navi Mumbai Airport) तयार करण्यात येत आहे. हे एअर पोर्ट कधीपर्यंत तयार होणार याबाबतची स्पष्टता नाही. या एअरपोर्टचे काम कधी पूर्ण होणार? जनतेच्या मागणी नुसार या एअरपोर्टला दि. बा. पाटील नाव देण्याचा जो प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवला आहे, तो मंजूर करून एअरपोर्टला दि. बा. पाटील नाव देण्यात यावे, अशी मागणी करतांनाच रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथी चिपी विमानतळाच्या विकासासाठी प्राधान्य द्यावे, अशी विनंती केली.

(हेही वाचा – Shirdi International Airport: शिर्डी विमानतळ जप्त होणार? काय आहे प्रकरण?)

मुंबईतील सांताक्रूझ येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या फक्त दोनच रनवे आहे जे ऐकमेकांना क्रॉस करतात, त्यामुळे विमान उड्डाण घेताना तसेच उतरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या विमानतळालगतच झोपडपट्टी आहे. देशातील पायाभूत सुविधेसाठी केंद्र सरकारने ११ लाख ११ हजार १११ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद किली आहे. विविध शहरातील पायाभूत सुविधा तसेच गरीब, मध्यमवर्गीय यांच्या विकासाठी ठेवण्यात आलेल्या या निधी पैकी १ लाख कोटी निधी देण्यात यावे. हा निधी प्राप्त झाल्यास येथील झोपडपट्टीचा शासनामार्फत पुनर्विकास करून या ठिकाणी अतिरिक्त रनवे तयार करणे शक्य होईल. त्यामुळे हा निधी देण्यात यावा, अशी मागणी करत, याबाबत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती वायकर यांनी संबंधीत खात्याचे मंत्री यांना केली. (Navi Mumbai Airport)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.