Air Pollution नियंत्रण उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश

133
Pollution : प्रदूषण जागृती आणि पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात शहाणपण देगा देवा मोहीम
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

वातावरणीय बदलांमुळे हवेच्या दर्जात होणारे बदल, त्यातून जनजीवनावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता, महानगरपालिकेने प्रमाणित कार्यपद्धतीसह उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. त्याहीपुढे जाऊन व सखोल अभ्यास करून वायू प्रदूषण (Air Pollution) नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना वेळीच कराव्यात. वातावरणीय जोखमींचे अधिक प्रभावीपणे व्यवस्थापन करून हरित दृष्टिकोन विकसित करावा, असे निर्देश महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयाने (वॉर्ड) आपल्या कार्यक्षेत्रात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक गरजानुरुप उपाययोजना आखाव्‍यात, उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी व देखरेखीसाठी समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, असे निर्देश देखील गगराणी यांनी दिले आहेत.

(हेही वाचा – Pravin Darekar यांनी सांगितला राजकारणातील ‘हा’ महत्त्वाचा पाया)

‘वातावरणीय बदल: हरित दृष्टिकोन विकसित करण्याची गरज’ या विषयावर महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या अध्‍यक्षतेखाली मुंबई महानगरपालिका मुख्‍यालयात मंगळवारी २४ सप्टेंबर २०२४ रोजी बैठक पार पडली. त्यावेळी गगराणी यांना विविध निर्देश दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्‍त (घनकचरा व्यवस्थापन) संजोग कबरे, उपआयुक्‍त (उद्याने) किशोर गांधी, उपआयुक्‍त (पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग) मिनेश पिंपळे, उपआयुक्‍त (विशेष अभियांत्रिकी) यतिन दळवी, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्‍हास महाले, संचालक (नियोजन) प्राची जांभेकर यांच्‍यासह सर्व परिमंडळांचे उपआयुक्‍त, २४ प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त, संबंधित अधिकारी, तसेच पर्यावरण व वातावरण बदल क्षेत्रातील संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.

(हेही वाचा – Imtiaz Jaleel यांना पोलिसांनी पिटाळून लावले; कोपरीत गुन्हा दाखल)

महानगरपालिकेच्‍या सर्व विभागांनी एकत्रित येऊन वायू प्रदूषण (Air Pollution) आणि वातावरणीय बदलाचे परिणाम ओळखून त्यावर एकसंघपणे काम करणे, जेणेकरून मुंबईला अधिक पर्यावरण स्नेही आणि वातावरण अनुकूल शहर बनविणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. त्याचप्रमाणे गत काही कालावधीपासून मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी होत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन, या उपाययोजना तसेच प्रमाणित कार्यपद्धती व नियमांचे पालन होत असल्याची सुनिश्चिती करणे, समन्वय अधिकाऱ्यांची प्रशासकीय विभाग (वॉर्ड) निहाय नियुक्ती करणे, बांधकामाच्या ठिकाणांची तपासणी करून तेथे सर्व नियमांचे पालन होत असल्याची सुनिश्चित करणे, या विषयावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.