Mumbai Pune Express Highway Block : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एक तासाचा ब्लॉक, वेळ जाणून घ्या

आतापर्यंत तीन वेळा असा ब्लॉक घेण्यात आला आहे.

20
Mumbai Pune Express Highway Block : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एक तासाचा ब्लॉक, वेळ जाणून घ्या ?
Mumbai Pune Express Highway Block : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एक तासाचा ब्लॉक, वेळ जाणून घ्या ?

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Express Highway Block) उद्या सोमवार, (१६ ऑक्टोबर)  (Monday 16th October) एक तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी १२.00 ते १ दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. Gantry बसण्याच्या वेळेत पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक खालापूर टोल नाका येथे तसेच शोल्डर लेनवर पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे.

कारचा मार्ग खोपोली एक्झिटवरून जुन्या महामार्गावरून शिंग्रोबा घाटातून मॅजिक पॉईंटवरून (Magic point) द्रुतगती महामार्गावर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या ब्लॉकदरम्यान प्रवास टाळावा. आतापर्यंत तीन वेळा कामासाठी असा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यावेळी सांगितलेल्या वेळेपेक्षा कमी वेळात ब्लॉक हटवण्यात आला होता. दुपारी १ नंतर हा मार्ग प्रवाशांसाठी खुला असेल.

(हेही वाचा – Ind vs Pak : … आणि क्रिकेटच्या देवाने पाकिस्तानी गोलंदाजाची बोलती बंद केली)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.