Mumbai Hawkers : नगर पथविक्रेता समितीच्या निवडणुकीसाठी २३७ उमेदवार रिंगणात, १७ जागांवर बिनविरोध निवड

1896
Mumbai Hawkers : नगर पथविक्रेता समितीच्या निवडणुकीसाठी २३७ उमेदवार रिंगणात, १७ जागांवर बिनविरोध निवड

नगर पथविक्रेता समितीच्या निवडणुकीसाठी फेरीवाल्यांमधून तब्बल २३७ उमेदवारांनी अर्ज केला असून येत्या २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या समितीच्या निवडणुकीसाठी २३७ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. तर १७ जागांवर प्रत्येक एकच अर्ज प्राप्त झाल्याने १७ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे, तर एकूण दहा जागांवर एकही अर्ज प्राप्त न झाल्याने या दहा जागा निवडणूक अभावी रिक्त राहणार आहेत.

मुंबईतील नगर पथविक्रेत्यांची १ शिखर समिती आणि ७ परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (७ समिती) एकूण ८ समित्यांसाठी गुरुवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुंबई महानगरासाठी असलेल्या शिखर समितीसह सात परिमंडळनिहाय समिती अशा एकूण आठ समित्यांच्या सदस्यपदासाठी निवडणूक लढवण्यास पात्र २३७ उमेदवारांची अंतिम यादी मंगळवार (२० ऑगस्ट २०२४) रोजी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अंतिम २३७ उमेदवारांपैकी १९० पुरुष तर ४७ महिला उमेदवार आहेत. निवडणुकीमध्ये शिखर समितीसह सातही परिमंडळांच्या मिळून एकूण ६४ जागांपैकी १० जागांवर एकही उमेदवार नाही. तर १७ जागांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्यामुळे या १७ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. (Mumbai Hawkers)

(हेही वाचा – Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीकडून ‘लाडकी बहीण’ योजनेचे कौतुक)

एकूण ३२ हजार ४१५ मतदार, मतदानासाठी ६७ केंद्र

मुंबईतील नोंदणीकृत नगर पथविक्रेता मतदारांची एकूण संख्या ३२ हजार ४१५ आहे. त्यामध्ये परिमंडळ-१ मधील ७ हजार ६८६, परिमंडळ-२ मधील ५ हजार ३०३, परिमंडळ-३ मधील ४ हजार ६६८, परिमंडळ-४ मधील ७ हजार ५०१, परिमंडळ-५ मधील २ हजार १६०, परिमंडळ-६ मधील ३ हजार ०३३, परिमंडळ-७ मधील २ हजार ०६४ मतदारांचा समावेश आहे. नगर पथविक्रेता समित्यांच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानासाठी प्रत्येक विभाग (वॉर्ड) स्तरावर मतदान केंद्र असतील. या निवडणुकीसाठी ६७ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहे. पथविक्रेत्यांची निवडणूक घेण्यासाठी अंतिम करण्यात आलेली नोंदणीकृत पथविक्रेता मतदार यादी ही महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर तसेच प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये (वॉर्ड) प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वेळेत मतदान होणार आहे. तर याच दिवशी सायंकाळी ५ वाजेनंतर मतमोजणी होवून निकाल जाहीर करण्यात येईल.

शिखर समितीसाठी ३३ अर्ज, अनुसूचित जमातीची जागा रिक्त

मुंबईत नगर पथविक्रेता समितीसाठी ५ ऑगस्ट २०२४ पासून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत असून नगर पथविक्रेता शिखर समितीसाठी एकूण ३३ अर्ज वैध ठरले आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती-३, इतर मागासवर्ग-४, अल्पसंख्यांक (महिला राखीव)-२, दिव्यांग (महिला राखीव)-२, सर्वसाधारण गट (खुला)-१९, सर्वसाधारण गट (महिला राखीव)-३ उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. अनुसूचित जमाती या प्रवर्गाकरिता एकही उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्यामुळे ही जागा तूर्त रिक्त राहणार आहे. (Mumbai Hawkers)

(हेही वाचा – India Export : जुलै महिन्यात भारताची निर्यात वाढली; दूध, मांस यांच्या निर्यातीत वाढ)

परिमंडळ १ मध्ये ४१ उमेदवार, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गाच्या जागा रिक्त

परिमंडळ-१ मधील नगर पथविक्रेता समितीच्या निवडणुकीसाठी एकूण ४१ अंतिम उमेदवार आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती-१, अल्पसंख्याक (महिला राखीव)-३, दिव्यांग-२, सर्वसाधारण-३१, सर्वसाधारण (महिला राखीव)-४ उमेदवारांचा समावेश आहे. अनुसूचित जाती या प्रवर्गाकरिता एकच उमेदवार असल्याने या पदाची निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली आहे. तर, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग या दोन प्रवर्गाकरिता एकही उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्यामुळे हे प्रवर्ग तूर्त रिक्त राहणार आहेत.

परिमंडळ २ मध्ये एकूण ३० उमेदवार, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक जागा रिक्त

परिमंडळ-२ मधील नगर पथविक्रेता समितीच्या निवडणुकीसाठी एकूण ४० अंतिम उमेदवार आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण-२८, सर्वसाधारण (महिला राखीव)-५, अनुसूचित जाती-३, दिव्यांग-३ उमेदवारांचा समावेश आहे. तर, इतर मागास वर्ग (महिला) या प्रवर्गाकरिता एकच उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्यामुळे या पदाची निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली आहे. तर, अनुसूचित जमाती व अल्पसंख्याक या दोन प्रवर्गाकरिता एकही उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्यामुळे हे प्रवर्ग तूर्त रिक्त राहणार आहेत.

(हेही वाचा – Jay Shah New ICC President ? जय शाह खरंच आयसीसीचे नवीन अध्यक्ष होणार?)

परिमंडळ ३ मध्ये २४ उमेदवार, पाच जागी बिनविरोध

परिमंडळ-३ मधील नगर पथविक्रेता समितीच्या निवडणुकीसाठी एकूण २४ अंतिम उमेदवार आहेत. अनुसूचित जाती (महिला)-१, अनुसूचित जमाती-१, अल्पसंख्याक (महिला)-१, सर्वसाधारण (महिला)-१, इतर मागास वर्ग-१ या पाच जागांसाठी प्रत्येकी एकच अंतिम उमेदवार असल्याने या पाचही जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित प्रवर्गांमध्ये दिव्यांग-२, सर्वसाधारण-१७ याप्रमाणे अंतिम उमेदवारांचा समावेश आहे. (Mumbai Hawkers)

परिमंडळ ४ मध्ये ३३ उमेदवार, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय जागेसाठी अर्जच नाही

परिमंडळ-४ मधील नगर पथविक्रेता समितीच्या निवडणुकीसाठी एकूण ३३ अंतिम उमेदवार आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती-२, अल्पसंख्याक-४, दिव्यांग (महिला राखीव)-२, सर्वसाधारण-१७, सर्वसाधारण (महिला राखीव)-८ उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग या दोन प्रवर्गाकरिता एकही उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्यामुळे हे प्रवर्ग तूर्त रिक्त राहणार आहेत.

(हेही वाचा – Rakesh Tikait यांनी ओकली गरळ; म्हणाले, आमची तयारी पूर्ण, भारताचा बांग्लादेश करणार)

परिमंडळ ५ मध्ये एकूण २७ उमेदवार, तीन जागांवर बिनविरोध

परिमंडळ-५ मधील नगर पथविक्रेता समितीच्या निवडणुकीसाठी एकूण २७ अंतिम उमेदवार आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती (महिला राखीव)-१, इतर मागास वर्ग (महिला राखीव)-२, अल्पसंख्याक-४, दिव्यांग-१, सर्वसाधारण-१८, सर्वसाधारण (महिला राखीव)-१ याप्रमाणे उमेदवारांचा समावेश आहे. यातील अनुसूचित जाती (महिला राखीव), दिव्यांग आणि सर्वसाधारण (महिला राखीव) या तीन प्रवर्गांमध्ये प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने या जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये एकही उमेदवार नसल्याने हा प्रवर्ग तूर्त रिक्त राहणार आहे.

परिमंडळ ६ मध्ये २२ उमेदवार, चार जागी बिनविरोध, एक जागा रिक्त

परिमंडळ-६ मधील नगर पथविक्रेता समितीच्या निवडणुकीसाठी एकूण २२ अंतिम उमेदवार आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती (महिला राखीव)-१, अनुसूचित जमाती-१, दिव्यांग-५, सर्वसाधारण-१३, सर्वसाधारण (महिला राखीव)-१, अल्पसंख्याक-१ याप्रमाणे उमेदवार आहेत. त्यामुळे अनुसूचित जाती (महिला राखीव), अनुसूचित जमाती, सर्वसाधारण (महिला राखीव), अल्पसंख्याक या चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर इतर मागासवर्गातून (महिला राखीव) एकही उमेदवार नसल्याने ही जागा तूर्त रिक्त राहणार आहे. (Mumbai Hawkers)

परिमंडळ ७ मध्ये १७ उमेदवार, तीन जागी बिनविरोध, एक जागा रिक्त

परिमंडळ-७ मधील नगर पथविक्रेता समितीच्या निवडणुकीसाठी एकूण १७ अंतिम उमेदवार आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती-१, इतर मागास वर्ग-१, अल्पसंख्याक-१ दिव्यांग-२, सर्वसाधारण (महिला राखीव)-२, सर्वसाधारण-१० याप्रमाणे अंतिम उमेदवारांचा समावेश आहे. अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, अल्पसंख्याक या तिन्ही प्रवर्गांमध्ये प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने या जागा बिनविरोध झाल्या आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये एकही उमेदवार नसल्याने ही जागा तूर्त रिक्त राहणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.