Mumbai Ganesh Visarjan 2024 : रात्री 11 वाजता समुद्राला मोठी भरती; सार्वजनिक गणपतींचे विसर्जन लवकर होण्याची शक्यता

174
Mumbai Ganesh Visarjan 2024 : रात्री 11 वाजता समुद्राला मोठी भरती; सार्वजनिक गणपतींचे विसर्जन लवकर होण्याची शक्यता
Mumbai Ganesh Visarjan 2024 : रात्री 11 वाजता समुद्राला मोठी भरती; सार्वजनिक गणपतींचे विसर्जन लवकर होण्याची शक्यता

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेला गणपती बाप्पा १० दिवसांच्या पाहुणचारानंतर मंगळवार, १७ सप्टेंबर रोजी विसर्जनासाठी निघणार आहे. मुंबईत घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे मिरवणुका काढून विसर्जन केले जाणार आहे. मुंबईतील बहुतांश मोठ्या मंडळांच्या गणपतीचे (Mumbai Ganesh Idols) विसर्जन गिरगाव चौपाटीवर केले होते. हे विसर्जन दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सुरु असते. यंदा मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास समुद्राला मोठी भरती येणार आहे. ही भरती बराच काळ राहील. त्यामुळे या काळात समुद्रात जाणे धोक्याचे ठरेल. त्यामुळे मुंबईतील गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन (Ganesh Visarjan 2024) लवकर होण्याची शक्यता आहे. (Mumbai Ganesh Visarjan 2024)

(हेही वाचा – ‘सार्वजनिक कार्यक्रमात फक्त 5 तास सहभागी, 10 दिवस परदेशात Rahul Gandhi यांनी काय केलं?’ भाजपाच्या नेत्यांनी उपस्थित केला प्रश्न)

लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि काही मोजके गणपती विसर्जनासाठी तराफ्यावर ठेवून खोल समुद्रात नेले जातात. मात्र अन्य मंडळांचे कार्यकर्ते गणपतीची मूर्ती उचलून विसर्जनासाठी समुद्रात नेतात. समुद्रात मोठी भरती आल्यास विसर्जन करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अनेक सार्वजनिक मंडळे रात्री 11 पूर्वी गणेशमूर्तीचे विसर्जन करू शकतात.

समुद्रकिनाऱ्यावर जेली फिशचा वावर, भाविकांना काळजी घेण्याचे आवाहन

गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जन करताना नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. राज्य सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागाने गिरगाव आणि दादर चौपाटी येथे अपायकारक माशांच्या अस्तित्वाची चाचपणी केली असता त्यात ढोमी, कोळंबी, स्टिंग रे (पाकट), जेली फिश, शिंगटी, ब्लू जेली फिश, घोडा मासा, छोटे रावस आदी मासे आढळले आहेत. नेटिंगमध्ये पाकट (स्टिंग रे) हा मासा आढळला. त्याचबरोबर जेली फिश, ब्लू जेली फिश हे मासेही आढळले. त्यामुळे विसर्जनाच्या वेळी भाविकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Mumbai Ganesh Visarjan 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.