Mumbai Alibaug Ferry Boat : तीन महिने बंद राहिलेली मांडवा – गेटवे जलवाहतूक पुन्हा सुरू

115
Mumbai Alibaug Ferry Boat : तीन महिने बंद राहिलेली मांडवा – गेटवे जलवाहतूक पुन्हा सुरू
Mumbai Alibaug Ferry Boat : तीन महिने बंद राहिलेली मांडवा – गेटवे जलवाहतूक पुन्हा सुरू

पावसाळ्याच्या कालावधीत बंद असलेली मुंबई-गेट वे ते मांडवा ही जलवाहतूक (Mumbai Alibaug Ferry Boat) सेवा 1 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे गणेशभक्तांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. अलिबाग येथे जाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. रस्तेमार्गे अलिबाग गाठण्यासाठी खूप वेळ खर्ची पडतो. मात्र, या मांडवा-गेट वे सेवेमुळे अलिबागमध्ये पोहोचण्यासाठी अवघा 1 तास लागतो. त्यामुळे अनेक नागरिकांसाठी ही जलवाहतूक खूप फायद्याची ठरते.

(हेही वाचा –रेल्वे स्थानकांवर ‘गणेश पंचरत्न’ प्रसारित करावे, खा. Naresh Mhaske यांचे रेल्वेमंत्र्यांना आवाहन)

जून ते ऑगस्ट या दोन महिन्याच्या कालावधीत पावसाचा जोर जास्त असतो. अशावेळी मांडवा- गेटवे जलवाहतूक बंद ठेवण्यात येते. आता पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे. त्यामुळं मांडवा ते गेट वे जलवाहतूक सेवा रविवारपासून सुरू करण्यात येत आहे. हवामानाचा अंदाज घेऊन दिवसाला एक ते दोन फेऱ्या होणार आहेत, असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. तीन महिने ही सेवा बंद होती. मात्र आता सेवा सुरू झाल्यापासून गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) कोकणात (Konkan) विशेषतः अलिबाग, मुरुड तालुक्यात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Mumbai Alibaug Ferry Boat)

(हेही वाचा –Raj Thackeray: १६ वर्षांपूर्वी दिलेलं चिथावणीखोर भाषण राज ठाकरेंना भोवलं!)

आठ महिने मांडवा ते गेटवे, गेटवे ते अलिबाग मांडवा असा प्रवास बोटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या पंधरा लाखांच्या आसपास आहे. मेरीटाईम बोर्डाच्या माहितीनुसार हा आकडा समोर आला आहे. या जलमार्गावरून पीएनपी, मालदार, अजंठा, अपोलो या कंपन्यांच्या प्रवासी बोटी सुरू असतात. 7 सप्टेंबरपासून गणेशोत्‍सव सुरू होत आहे. हा जलमार्ग खुला होत असल्याने गणेशोत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Mumbai Alibaug Ferry Boat)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.