Mukesh Ambani : फोर्ब्सच्या श्रीमंत भारतीयांच्या यादीत मुकेश अंबानीच अव्वल 

Mukesh Ambani : अंबानींची एकूण मालमत्ता १०८ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे 

194
Mukesh Ambani : फोर्ब्सच्या श्रीमंत भारतीयांच्या यादीत मुकेश अंबानीच अव्वल 
Mukesh Ambani : फोर्ब्सच्या श्रीमंत भारतीयांच्या यादीत मुकेश अंबानीच अव्वल 
  • ऋजुता लुकतुके 

रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी सर्वात श्रीमंत भारतीय हे स्थान सलग दुसऱ्या वर्षी अबाधित ठेवलं आहे. २०२४ च्या फोर्ब्स श्रीमंत भारतीयांच्या यादीत मुकेश अंबानी अव्वल स्थानावर तर दुसऱ्या क्रमांकावर अदानी उद्योग समुहाच्या गौतम अदानी विराजमान आहेत. दिवाळीच्या मूहूर्तावर अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बोनस शेअर गुंतवणूकदारांना देऊ केले आहेत. याशिवाय त्यांचा लहान मुलगा अनंत अंबानीच्या दिमाखदार विवाह सोहळ्यामुळेही गेल्यावर्षी चर्चेत होते. या खर्चानंतरही त्यांच्या संपत्तीत वर्षभरात २७.५ अब्ज अमेरिकन डॉलरची भर पडली आहे.

(हेही वाचा- २१ वे शतक आमचे; भारत-आसियान शिखर परिषदेत PM Narendra Modi यांचे उद्गार)

मुकेश अंबानींची (Mukesh Ambani) एकूण मालमत्ता या घडीला ११९.५ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. जगभरातील यादीत ते तेराव्या क्रमांकावर आहेत. यंदा फोर्ब्सच्या पहिल्या शंभर जणांच्या यादीत असलेल्या उद्योजकांची एकूण संपत्ती १ ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. इतकंच नाही तर गेल्या एका वर्षांत अब्जाधीशांच्या मालमत्तेत ४० टक्क्यांनी भर पडली आहे.

भारतीय शेअर बाजारांनी गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीय उद्योजकांच्या मालमत्तेतही या प्रमाणात वाढ झाली आहे. भारतीय श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ११६ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत ४८ अब्ज अमेरिकन डॉलरची भर पडली आहे. अंबानी आणि अदानींनंतर पोलाद आणि ऊर्जा उद्योगातील अग्रगण्य समुह असलेल्या जिंगाल समुहाच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल पहिल्यांदाच भारतीय यागीत तिसऱ्या स्थानावर पोहोचल्या आहेत. त्यांची संपत्ती ४८ अब्ज अमेरिकन डॉलर आहे. (Mukesh Ambani)

(हेही वाचा- Vidhansabha Election 2024 : विधानसभेसाठी शरद पवारांनी डाव टाकला; पण उलटणार त्यांच्यावरच ?)

सावित्री जिंदाल देशातील सर्वात श्रीमंत महिलाही आहेत. अब्जाधीशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर शिव नादर आहेत. त्यानंतर दिलीप संघवी, राधाकिशन दमानी, सुनील मित्तल, कुमारमंगलन बिर्ला, सायरस पुनावाला, आणि बजाज बंधू हे भारतीय उद्योजक पहिल्या दहांत आहेत. (Mukesh Ambani)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.