MPSC Exam 2023 : राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी ‘या’ तारखेला होणार मुलाखत

76
MPSC Exam 2023 : राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी 'या' तारखेला होणार मुलाखत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा, २०२३ (MPSC Exam 2023) च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांच्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती २८ व २९ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ८.३० वा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – Badlapur घटनेतील आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार, मुख्यमंत्र्यांचे निर्देश)

मुलाखतीस अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुलाखतीच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांनी मुलाखतीसाठी विहित दिनांकास व विहित वेळेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालय, ११ वा मजला, त्रिशुल गोल्ड फिल्ड, प्लॉट क्र. ३४, सरोवर विहार समोर, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४ येथे उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (MPSC Exam 2023)

(हेही वाचा – Badlapur: बदलापूरातील आंदोलनाला हिंसक वळण! शाळा फोडली, पोलिसांवर दगडफेक)

सही व शिक्क्यासह प्रमाणित केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र मुलाखतीच्यावेळी सादर करणे अनिवार्य आहे. विहित नमुन्यातील सर्व मूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे मुलाखतीच्या दिवशी सादर करणे आवश्यक असून, मूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही. तसेच कागदपत्रे सादर करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. (MPSC Exam 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.