Mahakumbh मध्ये आतापर्यंत 7 कोटींहून अधिक भाविकांचे स्नान

158
Mahakumbh मध्ये आतापर्यंत 7 कोटींहून अधिक भाविकांचे स्नान
Mahakumbh मध्ये आतापर्यंत 7 कोटींहून अधिक भाविकांचे स्नान

उत्तरप्रदेशच्या प्रयागराज (Prayagraj) येथे आयोजित महाकुंभ (Mahakumbh) मेळ्यात पहिल्या 4 दिवसात 7 कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावरील (Triveni Sangam) स्नानाला अनन्यसाधारण महत्व आहे. (Mahakumbh)

हेही वाचा-Accident News : पुणे – नाशिक महामार्गावर भीषण अपघात ; ९ जणांचा मृत्यू

महाकुंभाच्या पाचव्या दिवशी आज, शुक्रवारी (१७ जाने.) भक्‍तांचा अखंड ओघ सुरूच आहे. तर अनेक भाविकांनी संत महंतांच्या तंबुत जाऊन त्‍यांचे आशिर्वाद घेतले आणि कथांचे श्रवण केले. महाकुंभ मध्ये भक्‍त मोठ्या संख्येने हजेरी लावत असल्‍याचे चित्र दिसून येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी या गर्दीला सनातन धर्मा प्रती लोकांची दृढ श्रद्धेचे प्रतिक असल्‍याचे म्‍हटले आहे. भारतासोबतच जगभरातून मोठ्या संख्येने भाविक महाकुंभात सहभागी होत आहेत. (Mahakumbh)

हेही वाचा-Mahakumbh 2025 : महाकुंभवर PHD साठी देशभरातून आले अधिकारी; ‘या’ विषयांचा अभ्यास करणार

भक्‍तांसाठी महाकुंभात उत्‍कृष्‍ट व्यवस्‍था करण्यात आली आहे. भक्‍त इथल्‍या जेवणाच्या व्यवस्‍थेवरून देखील खूप समाधानी आहेत. सुरभी शोध संस्‍थान या समाजसेवी संस्‍थेकडून भक्‍तांसाठी फक्‍त नाश्त्‍याची व्यवस्‍था केलेली नाही तर त्यांच्या सेवेत अनेक कार्ये केली जात आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. कारण अशा प्रकारे शुद्ध आणि सात्‍विक अन्नासाठी कोणालाही धावपळ करावी लागत नाही. (Mahakumbh)

हेही वाचा-MLA Sangram Jagtap यांनी हटवले सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिरासमोरील अतिक्रमण

मौनी अमावस्येनिमित्त जास्तीत जास्त भाविकांनी स्नान करावे यासाठी योगी सरकार पूर्ण तयारी करत आहे. आगामी 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या स्नानादरम्यान 6 कोटींहून अधिक भाविकांच्या गर्दीला तोंड देण्यासाठी रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे. रेल्वेने केलेल्या अतिरिक्त व्यवस्थेमुळे भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. (Mahakumbh)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.