Home समाजकारण Monsoon : पाऊस उशिराने नाही तर ‘या’तारखेला येणार

Monsoon : पाऊस उशिराने नाही तर ‘या’तारखेला येणार

52

यंदाचा मान्सून उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. मात्र, नैऋत्य मान्सूनचे आज म्हणजेच १९ मे रोजी दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात आगमन झाले. यामुळे पुढील ३-४ दिवसांत नैऋत्य मान्सून, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून (IMD )देण्यात आली आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, मान्सूनच्या या आगमनामुळे कृषीप्रधान देश असलेल्या भारतात चार महिन्यांच्या पावसाळी हंगामाची सुरुवात झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, केरळमध्ये मान्सून सुरू होण्यास १ जूनच्या सामान्य तारखेपेक्षा थोडा जास्त वेळ लागू शकतो. पण मान्सूनच्या हालचालींमुळे यामध्ये बदल होण्याचीही शक्यता आहे.

(हेही वाचा Veer Savarkar : राष्ट्रसेविका समितीच्या दीडशे महिलांनी सावरकर स्मारकातील ‘लाईट अँड साऊंड शो’ पाहिला)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या ३-४ दिवसांमध्ये नैऋत्य मान्सून आणखी भागांमध्ये पुढे सरकण्याची अपेक्षा आहे. अशात भारताच्या $३.५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. त्यामुळे चांगला मान्सून शेताच्या सिंचनापासून ते पाणी साठवण्यापर्यंतच्या समस्या दूर करेल, अशी आशा हवामान खात्याला आहे.

काही दिवसांआधी हवामान खात्याकडून यंदा मान्सून केरळमध्ये उशिरा दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. पण पावसाची स्थिती अशीच राहिली तर सामान्यतः मान्सून केरळच्या १ जूनला दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खरंतर, मान्सून २९ मे, २०२१ मध्ये ३ जून, २०२० मध्ये १ जून, २०१९ मध्ये ८ जून आणि २०१८ मध्ये २९ मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता. त्यामुळे यंदा मान्सून कधी दाखल होणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
error: Content is protected !!