Missed 31st July Deadline : आयकर विवरणपत्र भरण्याची ३१ जुलैची तारीख हुकली तर काय कराल?

Missed 31st July Deadline : ३१ डिसेंबर पर्यंत तुम्ही विवरणपत्र भरू शकता. पण, या आहेत अटी

156
Missed 31st July Deadline? आयकर विवरणपत्र भरण्याची ३१ जुलैची तारीख हुकली तर काय कराल?
Missed 31st July Deadline? आयकर विवरणपत्र भरण्याची ३१ जुलैची तारीख हुकली तर काय कराल?
  • ऋजुता लुकतुके

आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. आयकर विभागाने यंदा ही मुदत वाढवून दिलेली नाही. त्यामुळे ज्यांनी बुधवारपर्यंत विवरणपत्र भरली नाहीत, त्यांच्यासाठी आता काही मार्ग आहे का ते पाहूया, (Missed 31st July Deadline)

तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत आपलं आर्थिक विवरणपत्र भरू शकणार आहात. पण, त्यासाठी काही दंड तुम्हाला भरावा लागेल. मुदतीनंतर भरलेलं विवरणपत्र हे बिलेटेड रिटर्न्स या नावाने ओळखलं जातं. आयकर नियमाच्या १३९ (४) या कलमानुसार असं विलंबित विवरणपत्र भरता येतं. (Missed 31st July Deadline)

(हेही वाचा- Crime News : सातारा हादरलं! प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरून ढकलले)

ज्यांचं आयकर देयत्व ५ लाखांपेक्षा जास्त आहे अशांना ५,००० रुपयांचा दंड भरून विलंबित विवरणपत्र भरता येईल. तर ज्यांचं करदायित्व ५,००० रुपयांपेक्षा कमी आहे अशांना १,००० रुपयांचा दंड बसेल. या दंडाव्यतिरिक्त आणखी दोन तोटे विलंबित विवरणपत्र भरताना तुम्हाला होतात. यातील सगळ्यात महत्त्वाचा तोटा म्हणजे अलीकडेच सरकारने जुनी आणि नवीन अशा दोन कर प्रणाली उपलब्ध करून दिल्या आहेत.  (Missed 31st July Deadline)

तुम्ही विलंबित विवरणपत्र भरत असाल तर तुम्हाला नवीन कर प्रणाली अंतर्गतच विवरणपत्र भरता येईल. नवीन कर प्रणालीत ८० सी, डी अंतर्गत मिळणारी कुठलीही कर वजावट मिळत नाही. शिवाय या कर प्रणालीत तुम्हाला सूटही कमी मिळते. विलंबित विवरणपत्रासाठी आता फक्त नवीन कर प्रणालीच उपलब्ध आहे. (Missed 31st July Deadline)

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : स्वप्निल कुसळेचा ५० मीटर थ्री पोझिशनचा अंतिम सामना, भारतीय संघाचं गुरुवारचं वेळापत्रक )

दुसरा महत्त्वाचा तोटा होतो तो तुम्ही भांडवली नफा किंवा इतर कुठलाही गेल्यावर्षी झालेला तोटा तुम्ही नवीन विवरणपत्र भरताना गृहित धरू शकत नाही. एरवी तीन वर्षांचा तोटा तुम्हाला यासाठी गृहित धरता येतो. या दोनही गोष्टींमुळे तुमचं कर दायित्व अर्थातच वाढतं.  (Missed 31st July Deadline)

काही घटक आहेत ज्यांना विलंबित आयकर विवरणपत्र भरत असतानाही कुठलाही दंड लागू होत नाही. ज्यांची मूळातच विवरणपत्र भरण्याची मुदत ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आहे, ज्यांनी विवरणपत्र भरणं अनिवार्य नाही आणि ज्यांचं करदायित्व शून्य आहे असे लोक विना दंड आर्थिक विवरणपत्र भरू शकतात. (Missed 31st July Deadline)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.