MHADA : म्हाडा मुंबई मंडळातर्फे २०३० सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत जाहीर; शुक्रवारी होणार ‘गो लाईव्ह’

6334
MHADA च्या 'त्या' मंडळातील अभियंत्यांवर होणार कारवाई?

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला ०९ ऑगस्ट, २०२४ रोजी दुपारी १२ वाजेपासून प्रारंभ होणार आहे. या सोडतीची जाहिरात दि. ०८ ऑगस्ट, २०२४ रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रांत तसेच म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून सदनिका सोडतीबाबत माहिती देणारी पुस्तिका या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या शुभहस्ते शुक्रवार, ०९ ऑगस्ट, २०२४ रोजी ‘गो लाईव्ह’ समारंभाद्वारे प्रारंभ केला जाणार आहे. यानंतर सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची लिंक मंडळाद्वारे दुपारी १२.०० वाजेपासून उपलब्ध राहील. तसेच नोंदणीकृत अर्जदार देखील ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत ०४ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत आहे. तसेच ऑनलाईन अनामत रकमेची स्विकृती दिनांक ०४ सप्टेंबर, २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केली जाणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी ०९ सप्टेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती दाखल करण्यासाठी दिनांक ०९ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक ११ सप्टेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत केली जाणार आहे. प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत १३ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता काढण्यात येणार असून सोडतीचे ठिकाण मंडळातर्फे लवकरच जाहीर केले जाईल.

(हेही वाचा – Nepal Helicopter Crash: नेपाळमधील नुवाकोट येथे हेलिकॉप्टर कोसळले, ४ प्रवाशांचा मृत्यू)

मुंबई मंडळाच्या सन २०२४ च्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (Economically Weaker Section) ३५९ सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group) ६२७ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) ७६८ सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी (Higher Income Group) २७६ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या १३२७ सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३ (५), ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा (Housing Stock) म्हणून म्हाडाला प्राप्त ३७० सदनिका (नवीन व मागील सोडतीतील सदनिका) व मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या ३३३ सदनिकांचा समावेश आहे.

म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android)अथवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर अनुक्रमे गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरमध्ये Mhada Housing Lottery System या नावे मोबाइल अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील अर्ज नोंदणी, अर्ज भरणा व पेमेंट प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनीचित्रफिती आणि हेल्प फाईल या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास मुंबई मंडळ कोणत्याही व्यवहारास/फसवणूकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे.

(हेही वाचा – Bangladesh मधील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत; हिंदु जनजागृती समितीची मागणी)

वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा

अत्यल्प उत्पन्न गट : सहा लाखापर्यंत
अल्प उत्पन्न गट : नऊ लाखापर्यंत
मध्यम उत्पन्न गट : बारा लाखापर्यंत
उच्च उत्पन्न गट : बारा लाखांहून अधिक

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.