मुंबई पश्चिम उपनगरला हार्बर लाईन जोडणार; Metro 2B ने वेळ वाचणार

2094
मुंबईत मेट्रोने प्रवाशांचा बऱ्याच वेळ वाचवला आहे. तसेच यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली आहे. आजवर मुंबई आणि उपनगरला मेट्रोचे जाळे पसरवून लोकलसेवेला पर्याय निर्माण केला आहे. आता पश्चिम उपनगरला थेट हार्बर लाईन जोडण्यात आली आहे. त्यासाठी Metro 2B या मार्गिकेची मेट्रो लाईन चमत्कार घडवणार आहे. एमएमआरडीएकडून डी.एन.नगर ते मंडाळे मेट्रो 2ब मार्गिकेचा चेंबूर डायमंड मार्केट ते मंडाले हा पहिला टप्पा सुरू होऊ शकतो. त्यासाठी मानखुर्द येथील उपनगरीय रेल्वे मार्गावर गर्डर उभारण्याचे काम एमएमआरडीएकडून पूर्ण करण्यात आले आहे.
Metro 2A आणि 2B हा मार्ग दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम, डीएन नगर आणि अंधेरी पश्चिम डीएन नगर ते मंडाले डेपो असा आहे. मेट्रो लाइन 2B ची लांबी 24 किमी असून या मार्गावर 20 स्थानके असणार आहेत. या मेट्रो प्रकल्पाचा खर्च 10,986 कोटी इतका असणार आहे. डीएननगर येथील ईएसआयसी वसाहत ते मंडाले मेट्रो 2B मार्गिका ही मेट्रो 2A मार्गिकेचा विस्तार आहे. मेट्रो 2B प्रकल्पामुळं पूर्व उपनगरातून थेट दहिसरपर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना पश्चिम उपनगरात येणे सहज शक्य होणार आहे. मात्र हा मार्ग सुरू होण्यासाठी जून 2025 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मेट्रो 2B चे काम 60 टक्के पूर्ण झाले आहे.

Metro 2B वर कोणती आहेत स्थानके? 

डीएननगर (ईएसआयसी नगर), प्रेम नगर, इंदिरा नगर, नानावटी हॉस्पिटल, खिरा नगर, सारस्वत नगर, नॅशनल कॉलेज, वांद्रे मेट्रो, आयकर कार्यालय, आयएलएफएस, एमटीएनएल मेट्रो, एसजी बर्वे मार्ग, कुर्ला (पू), ईईएच चेंबूर, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मानखुर्द, मंडाले मेट्रो अशी स्थानकं या मार्गावर असणार आहेत. मेट्रो 2Bचा डेपो मंडाला येथे असणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.