Megablock : मुंबईकरांनो, रविवारी प्रवासाचे नियोजन करताय तर आधी मेगाब्लॉक जाणून घ्या  

132

मध्य रेल्वेने रविवार, २१ मे २०२३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या  कामांकरीता उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी रविवारी प्रवासाचे नियोजन करण्याआधी मेगाब्लॉक कुठे आहे हे समजून घ्यावे.

सकाळी ११.०५ ते दुपारी ०३.५५ पर्यंत माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ०३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.

(हेही वाचा Trimbakeshwar Temple : औरंगजेबाने त्र्यंबकेश्वर मंदिर पाडून बांधलेली मशीद; मराठ्यांनी केला जीर्णोद्धार; नाशिकच्या ज्योतिर्लिंगाचा काय आहे इतिहास?)

पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत
(बेलापूर/नेरुळ – खारकोपर मार्ग वगळून)

पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत  सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत  सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेलकरीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर – खारकोपर आणि नेरुळ – खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील. या मेंटेनन्स ब्लॉकमुळे प्रवाशांना होणारऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.