Mega Beach Clean Drive : मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबईतील जुहू चौपाटीवर जी -२० परिषद अंतर्गत ‘मेगा बीच क्लीन’ ड्राइव्हचे आयोजन

केंद्र सरकारने सागरी स्वच्छतेच्या (Mega Beach Clean Drive) उद्देशाने माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यात महाराष्ट्रातील ८० शाळांचा सहभाग असल्याची माहिती त्यांनी दिली.

186
Mega Beach Clean Drive : मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबईतील जुहू चौपाटीवर जी -२० परिषद अंतर्गत ‘मेगा बीच क्लीन’ ड्राइव्हचे आयोजन

मुंबईत २१ मे पासून होत असलेल्या जी-२० परिषदेच्या पर्यावरण कार्यगट बैठकीच्या पार्श्वभूमीवर जुहू समुद्र किनाऱ्यावर रविवार २१ मेच्या सकाळी भव्य स्वच्छता अभियान (Mega Beach Clean Drive) राबवण्यात आले.

माननीय राज्यपाल श्री. रमेश बैस, माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्री श्री. भूपेंद्र यादव, केंद्रीय राज्यमंत्री श्री. अश्विनीकुमार चौबे, राज्याचे पर्यटन, महिला व बालकल्याण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, आमदार श्री. अमीत साटम, केंद्रीय पर्यावरण सचिव निलानंदन, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल, राज्याचे पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव श्री. प्रवीण दराडे यांसह नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेत (Mega Beach Clean Drive) सहभाग नोंदवून समुद्र किनारी स्वच्छता केली.

पर्यावरण (Mega Beach Clean Drive) आणि हवामान शाश्वतता कार्यगट बैठकीसाठी आलेले विविध देशांचे प्रतिनिधीही या अभियानात सहभागी झाले. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त (परिमंडळ ३) श्री. रणजित ढाकणे, सहायक आयुक्त (के पश्चिम) डॉ. पृथ्वीराज चौहान आणि सर्व संबंधित अधिकारी यांनी मोहिमेचे संयोजन केले.

(हेही वाचा – Eknath Shinde : सामुदायिक विवाहासाठी यापुढे २५ हजार रुपये अनुदान मिळणार? मुख्यमंत्री शिंदे यांनी दर्शवली सकारात्मकता)

माननीय राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी यावेळी हिंदी भाषेत, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेत, केंद्रीय मंत्री श्री. भूपेंद्र यादव यांनी इंग्रजी भाषेत पर्यावरण संवर्धन तसेच सागरी स्वच्छतेची उपस्थितांना शपथ दिली.

जी-२० परिषदेचे अध्यक्षपद यंदा भारत भूषवत आहे. याअंतर्गत देशातील विविध शहरांमध्ये विविध विषयांवर बैठकांचे आयोजन होत आहेत. दिनांक २१ ते २३ मे २०२३ दरम्यान मुंबईमध्ये पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाची (ईसीएसडब्ल्यूजी) बैठक होत आहे. याच पार्श्वभूमीवर जुहू समुद्रकिनारी भव्य स्वच्छता मोहिमेचे (Mega Beach Clean Drive) आयोजन करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्हणाले की, “स्वच्छता हे फार महत्त्वाचे कार्य आहे. संत ज्ञानेश्वर यांनी धरतीच्या कल्याणाचा संदेश दिला होता. आज याक्षणी आपणही संपूर्ण विश्व स्वच्छ ठेवण्याचा संदेश जगाला देवू या. राज्य सरकार पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेसाठी (Mega Beach Clean Drive) सातत्याने उपक्रम राबवत आहे. भारताला जी-२० चे अध्यक्षपद मिळणे ही तमाम भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.” अशी भावना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री श्री. भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, “केंद्र सरकारने सागरी स्वच्छतेच्या (Mega Beach Clean Drive) उद्देशाने माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यात महाराष्ट्रातील ८० शाळांचा सहभाग असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी (Mega Beach Clean Drive) सेल्फी पॉईंट, वाळूशिल्प कला, छायाचित्र स्पर्धा तसेच अन्य स्टॉललाही मान्यवरांनी भेटी दिल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.