Badlapur explosion: बदलापूरात रासायनिक कंपनीत भीषण स्फोट; कंपनी बेचिराख

215
Badlapur explosion: बदलापूरात रासायनिक कंपनीत भीषण स्फोट; कंपनी बेचिराख
Badlapur explosion: बदलापूरात रासायनिक कंपनीत भीषण स्फोट; कंपनी बेचिराख

बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीत रेअर फार्मा नावाच्या रासायनिक कंपनीत सोमवारी पहाटे ४:३० वाजता भीषण स्फोट (Badlapur explosion) झाला. या स्फोटामुळे कंपनीतील संपूर्ण परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आणि संपूर्ण कंपनी बेचिराख झाली. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, रिऍक्टरसोबत असलेला रिसिव्हर तब्बल ४०० मीटर लांब उडून गेला आणि माणकिवली गावातील एका चाळीवर जाऊन कोसळला.

(हेही वाचा –Delhi Hit and Run: रॅपिडोच्या बाईक रायडरला सरकारी अधिकाऱ्याने २ किमीपर्यंत फरफटत नेलं आणि…)

या दुर्घटनेत चाळीत राहणाऱ्या कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत. यात एक पुरुष, एक महिला, आणि एक लहान मुलीचा समावेश आहे. जखमींमध्ये गंभीर जखमींना मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे, तर एका व्यक्तीवर बदलापूरमध्येच उपचार सुरू आहेत. (Badlapur explosion)

(हेही वाचा –Raj Thackeray : विधानसभेसाठी मनसेकडून दोन उमदेवार जाहीर)

घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान येऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले. अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांच्या माहितीनुसार, स्फोटामुळे कंपनीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, तपास सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे, कंपनीतील कोणत्याही कामगाराला कोणतीही इजा झाली नाही. स्थानिक प्रशासन आणि पोलीस या घटनेच्या चौकशीसाठी पुढील पावले उचलत आहेत. या स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, अधिकृत तपासानंतरच स्फोटाच्या कारणांची अधिकृत माहिती मिळेल, अशी माहिती देण्यात आली आहे. (Badlapur explosion)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.