Maratha Reservation : जरांगे यांनी आंदोलनाचं स्वरूप बदललं; आमरण उपोषण मागे घेऊन साखळी उपोषण सुरु

मनोज जरांगेकडून सरकारला एका महिन्याचा अवधी

46
Maratha Reservation : जरांगे यांनी आंदोलनाचं स्वरूप बदललं; आमरण उपोषण मागे घेऊन साखळी उपोषण सुरु

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील हे अजूनही आपल्या उपोषणावर ठाम आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा नवीन GR निघेपर्यंत माघार घेणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. त्यांनी आज म्हणजेच मंगळवार १२ सप्टेंबर रोजी आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण आपल्या भूमिकेवर आणि उपोषणावर ठाम असल्याचे सांगितले.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

जोपर्यंत सर्वसामान्य मराठा जनतेच्या (Maratha Reservation) हातात आरक्षणाचं पत्र पडत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. तुम्हाला विचारल्याशिवाय मी कोणतंही पाऊल उचलणार नाही. मी तुमच्यापुढे जाणार नाही. मी तुमच्यासाठी जीवाची बाजी लावणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत पहिल्यांदाच बैठक घेतली. सर्व पक्षांनी मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. ठरावाची प्रत मला देण्यात आली आहे. मी पारदर्शकपणे काम करतो, असं जरांगे पाटील म्हणाले.

आमरण उपोषण मागे घेऊन साखळी उपोषण सुरु

मनोज जरांगे पुढे बोलतांना म्हणाले की; ” मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) मिळेपर्यंत मी घराचा उंबरठा शिवणार नाही. सगळे संशोधक, अभ्यासक, तज्ज्ञ सरकारला वेळ द्यावा असं म्हणत असेल तर आपण सरकारला हा वेळ देऊ. पण मराठ्यांचा पोरांचा घात होऊ देणार नाही. या प्रक्रियेला वेळ लागेल. आपण सरकारला ४० वर्षे दिली आहेत, आणखी १ महिना देऊ. मात्र आंदोलन सुरूच राहणार, आमरण उपोषण मागे घेऊन आजपासून आंदोलनस्थळी साखळी उपोषण सुरू ठेऊ. जरी १ महिन्याचा वेळ दिला तरी मी आंदोलनस्थळ सोडणार नाही. मराठ्यांना जोपर्यंत कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, आपल्याला पर्याय नाही, अन्यथा आपल्या डोक्यावर खापर फोडले जाईल असं जरांगे यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – OBC Reservation : मराठा पाठोपाठ ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही गाजणार; ओबीसी समाजाकडून आंदोलनाचा इशारा)

जरांगेकडून सरकारला एका महिन्याचा अवधी

जरांगे पुढे म्हणाले की; सरकारला आपण ४० वर्षे दिली आहेत. मात्र सरकारने एका दिवसात (Maratha Reservation) जीआर काढला आहे, पण ते न्यायालयात टिकणार नाही. त्यामुळे आता सरकारला आपण एका महिन्याचा अवधी आहे. एका महिन्याचा वेळ दिला तर न्यायलयात टिकणारं आरक्षण देणार का? अशी विचारणा त्यांनी सरकारकडे केली.

आपल्याला अभ्यास करून आरक्षण मिळवायचे

फक्त घोषणा दिल्याने आपल्याला आरक्षण (Maratha Reservation) मिळणार नाही. आपल्यात फक्त एकविचार असला पाहिजे. आपल्याला अभ्यास करून आरक्षण मिळवायचे आहे. मागील दोन दिवसांपासून पाणी आणि उपचार बंद केले होते. पण आपल्या समाजाचं म्हणणं आहे की, आम्हाला आरक्षण आणि तुम्ही पण हवे आहेत. त्यामुळे रात्री उपचार घेतले. मी समजासाठी जीवाची बाजी लावणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.