Maratha Reservation : सरकारने त्यांच्या अध्यादेश मध्ये “ती ” अट वगळावी ,मग आम्ही आंदोलन मागे घेऊ – मनोज जरांगे

मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरूच

28
Maratha Reservation : सरकारने त्यांच्या अध्यादेश मध्ये
Maratha Reservation : सरकारने त्यांच्या अध्यादेश मध्ये "ती " अट वगळावी ,मग आम्ही आंदोलन मागे घेऊ - मनोज जरांगे

मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation) मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आज आपला निर्णय सांगणार असल्याचं सांगितलं होतं. निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यांच्या घोषणेनंतर जरांगे यांच्या निर्णयाकडे राज्यभराचे लक्ष लागलं होतं. पण मनोज जरांगे आपल्या आंदोलन आणि उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, वंशावळीची अट ठेवू नये अशी मागणी यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी केली आहे

त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, सरकारने काही निर्णयांसंदर्भात घोषणा केल्या आहेत. त्या निर्णयांची प्रत अद्याप आपल्यापर्यंत आलेली नाही. माध्यमांमधून काही ठराविक माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. पण सरकारकडून अधिकृत जीआर आलेला नाही. सरकारनं काल एक निर्णय घेतलाय.. ज्या मराठा समाजाकडे कुणबी असल्याच्या नोंदी असतील, त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र आजपासून दिले जातील”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. वंशावळीचे दस्ताऐवज अनेक लोंकाकडे नाहीत. तर वंशावळीची अट ठेवू नये अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

(हेही वाचा : Dahi Handi : राज्यभरात दहीहंडीचा उत्साह, मुंबई- ठाण्यात गोविंदा पथक रचतायेत भव्य मनोरे)

सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, पण त्यामध्ये थोडा बदल करण्यात यावा, सरकारने तो बदल करून घ्यावा त्यानंतर आम्ही निर्णय घेतो असंही जरांगे यावेळी म्हणाले आहेत. निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामध्ये थोडा बदल करा सरसकट मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावी अशी मागणी यावेळी मनोज जरांगे यांनी केली आहे.आमचे आंदोलन शांततेत सुरू राहणार असून राज्यातील समाज बांधवांनी ही आंदोलन शांततेत करावे, असे ही आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी म्हटले असून मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असे जरांगे यांनी यावेळी जाहीर केले आहे.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.