Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दुसरी आत्महत्या

25
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दुसरी आत्महत्या

मंगळवार, २४ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनापूर्वीच जालन्यातील ४७ वर्षीय आंदोलनकर्त्याने मुंबईतील वांद्रे पूर्व येथे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (१९ ऑक्टोबर) पहाटे उघडकीस आली. सुनील बाबुराव कावळे असे या आंदोलनकर्त्याचे नाव होते. या आंदोलनकर्त्याच्या आत्महत्येमुळे मराठा आंदोलन चिघळणार असल्याची शक्यता वर्तवली जात असतांनाच अजून एका तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे.

अधिक माहितीनुसार, मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) नांदेडमधील एका तरुणानं टोकाचं पाऊल उचललं आहे. नांदेडमधील तरुणानं विष प्राशन करुन मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. तरुणाच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोटही सापडली आहे. नांदेडमधील हदगांव तालुक्यातील वडगाव इथल्या शुभम सदाशिव पवार या तरुणानं आपलं जीवन संपवलं आहे. शुभमनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज हदगांव- तामसा इथे बंद पाळला जाणार असल्याची घोषणा गावागावांतील मराठा संघटनांकडून करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Maratha Reservation : आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही – मनोज जरांगे पाटील)

आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही

मनोज जरांगे पाटील (Maratha Reservation) पुढे म्हणाले की, आपल्या जातीवर अन्याय होतो आहे, म्हणून आपण एकजुट झालो. त्यामुळे असच आपण एकजुटीने सोबत राहील पाहिजे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही. आपली मुलं नोकरी, उच्च शिक्षणापासून वंचित राहीले नाही पाहिजे. शांततेत आरक्षणाचा लढा सुरु झाला. आजपर्यंत सुरु आहे. मात्र सगळ्याला पोसले तेच आज आपल्याला डाग लावतात, आता त्यांचाच नंबर आहे. आरक्षणाच्या विरोधात बोलला तर सु्ट्टीच नाही. 55 पेक्षा जास्त मराठा बांधवांनी बलिदान दिल आहे. त्यांची मुलं उन्हात पडली आहेत, त्यांच्यावर मायेचं छत्र ठेवावं लागणार आहे. हा पहिला आणि शेवटचा लढा समजून आरक्षण मिळालच पाहिजे, इतक्या ताकदीने लढा लढायचा आहे. (Maratha Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.