Malad Mumbai Accident : मालाड येथे भीषण अपघात; कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

204
Malad Mumbai Accident : मालाड येथे भीषण अपघात; कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
Malad Mumbai Accident : मालाड येथे भीषण अपघात; कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

मुंबईच्या मालाड भागात हिट अँड रनप्रमाणे (Hit and Run) अपघात झाल्याचे समोर आले आहे. एका कारने महिलेस कारखाली चिरडले आणि डिव्हायडरपर्यंत खेचत नेले आहे. अपघातात चिरडलेल्या २७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. आमदार अस्लम शेख यांच्या घराबाहेरील रस्त्यावरील ही घटना घडली आहे. ३ सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली आहे. (Malad Mumbai Accident)

ही महिला मेहंदी क्लास संपवून पायी घरी परतत होती. त्या वेळी मागून येणाऱ्या भरधाव कारने तिला धडक दिली. अपघातात सत्तावीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शी आणि कार चालकाने महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला. कारचालक मर्चेंट नेव्ही मध्ये सेवेला असल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांनी कारचालकाला बेदम मारहाण केली आहे. जमावाकडून मारहाण झाल्याने चालक देखील गंभीर जखमी झाला आहे.

(हेही वाचा – ऊर्जा निर्मितीसाठीच्या सामंजस्य करारामुळे अर्थव्यवस्था वाढीस गती, ६२ हजाराहून अधिक रोजगार निर्मिती – DCM Devendra Fadnavis)

कार चालकाला नागरिकांनी पोलिसांच्या हवाली केले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. चालकाने मद्यपान केले होते किंवा नाही, हे स्पष्ट नाही. पोलिसांनी चालकाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. मद्यपान केले होते किंवा नाही, हे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. नागरिक प्रचंड आक्रमक झाले होते. त्यांनी पोलिसांसमोरच कार चालकाला मारहाण केली आहे.

पुण्यातील घटनेनंतर राज्यात अपघातांचे लोणच पसरले आहे. पुण्यानंतर (Hit and Run) वरळीमध्ये अशाच प्रकारची एक घटना समोर आली होती. आरोपी मिहीर शहाने मद्यधुंद अवस्थेमध्ये एका दाम्पत्याला उडवले होते. महिलेला जवळपास एक किलोमीटर अंतरावर फरफटत नेण्यात आले होते. यात महिलेचा मृत्यू झाला. आता असाच प्रकार मालाडमध्ये समोर आला आहे. (Malad Mumbai Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.