Maharashtra Weather: ऑगस्ट महिन्यात मुंबईत विक्रमी उकाडा! पाऊस कधी परतणार? वाचा सविस्तर

135
Maharashtra Weather: ऑगस्ट महिन्यात मुंबईत विक्रमी उकाडा! पाऊस कधी परतणार? वाचा सविस्तर
Maharashtra Weather: ऑगस्ट महिन्यात मुंबईत विक्रमी उकाडा! पाऊस कधी परतणार? वाचा सविस्तर

मुसळधार पावसानं (Maharashtra Weather) झोडपून काढल्यानंतर आता ऑगस्ट महिन्यामध्ये मात्र हा पाऊस संपूर्ण राज्यातच लपंडावाचा खेळ खेळताना दिसला. दरम्यानच्या काळात सूर्यकिरणांनी बहुतांश जिल्हे न्हाऊन निघाले आणि अनेक ठिकाणी तापमानाचा आकडाही वाढला. गुरुवारी मुंबई (Mumbai) शहरात 33.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत नोंदवण्यात आलेलं हे सर्वाधिक तापमान ठरलं.

(हेही वाचा –Ramgiri Maharaj यांचे ‘सर तन से जुदा’ करण्याचा ‘स्टेटस’ ठेवणारा डॉ. महंमद साद याला अटक)

यापूर्वी मुंबईत 1969 मध्ये 26 ऑगस्ट या दिवशी 33.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली होती. मुंबईत मान्सूननं घेतलेली विश्रांती ही या तापमानवाढीमागचं मुख्य कारण सांगण्यात येत आहे. तेव्हा आता शहरात पाऊस नेमका कधी परततो आणि या उकाड्यापासून नागरिकांची सुटका कधी होते? याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. (Maharashtra Weather)

(हेही वाचा –Ghatkopar Hoarding Accident : माजी पोलीस आयुक्तांचा निकटवर्तीय अर्षद खान विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी)

हवामान खात्याच्या माहितीनुसार शनिवार रविवारी मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडला देखील मुसळधार पाऊस पडणार असून, ठाण्यासह रायगडला शनिवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. (Maharashtra Weather)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.