Maharashtra TET 2024 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबरला, माहितीसाठी संकेतस्थळ उपलब्ध

126
Maharashtra TET 2024 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबरला, माहितीसाठी संकेतस्थळ उपलब्ध
Maharashtra TET 2024 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबरला, माहितीसाठी संकेतस्थळ उपलब्ध

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 (MAHATET 2024) आगामी काळात दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे. (Maharashtra TET 2024)

(हेही वाचा- Ban Ind vs Ban Test Series : बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या वार्तांकनावर बंदीचा ‘हिंदुस्थान पोस्ट’चा निर्णय )

इयत्ता पहली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक व शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. (Maharashtra TET 2024)

ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईट वर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. 9 सप्टेंबर पासून सुरु झाली असुन दि. 30 सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. (Maharashtra TET 2024)

(हेही वाचा- Ganeshotsav 2024 : ‘मरे’च्या गणपती उत्सवासाठी २२ विशेष रात्रीच्या उपनगरीय गाड्या)

ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी दि. 9 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 राहील. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढुन घेण्याचा कालावधी दि. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2024 राहील. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर I दि. 10 नोव्हेंबर 2024 व वेळ सकाळी 10.30 ते 1.00 पर्यंत राहील. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II दि. 10 नोव्हेंबर व वेळ दुपारी 2.00 ते 4.30 पर्यंत राहील, पात्रता परीक्षेच्या तारीख व वेळ यासंबंधी नोंद घ्यावी, असे आवाहन संजय कुमार राठोड महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजय कुमार राठोड यांनी केले आहे. (Maharashtra TET 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.