महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे प्राचार्य काशिनाथ भोईर यांना राज्यस्तरीय Best Principal पुरस्कार प्रदान 

305

महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे (Maharashtra Military School) प्राचार्य काशिनाथ भोईर यांना या वर्षीचा स्टार एज्युकेशनचा (STAR EDUCATION) ‘बेस्ट प्रिंन्सिपल इन स्कूल्स’ (Best Principal) हा राज्यस्तरीय महत्त्वपूर्ण पुरस्कार मिळाला आहे. 27 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबईत बीकेसी मैदानात एका समारंभात सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्टार एजुकेशन ही राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेली एक अग्रगण्य संस्था असून देशातील आणि राज्यातील शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी पुरस्कार प्रदान करत असते.

(हेही वाचा – ICC Test Ranking : जसप्रीत बुमराह आयसीसी क्रमवारीत पुन्हा अव्वल)

शैक्षणिक क्षेत्रातील अनेकविध वस्तू उत्पादकांना एकत्र आणून नामांकित शाळांना आवश्यक ते तंत्रज्ञान व त्या अनुषंगिक उत्पादनांचा परिचय घडवून आणण्यासाठी स्टार एजुकेशन संस्था देशपातळीवर काम करीत आहे. या करता मुंबईतील एमएमआरडीए ग्राऊंडवर एक भव्य शैक्षणिक प्रदर्शन (Educational Expo.) आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत निवडक गुणवंत व्यक्तींचा सदर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. भारतातील विविध राज्यातून आणि महाराष्ट्र राज्यातील तीनशे हून अधिक गुणवंत या समारंभास उपस्थित होते. स्टार एजुकेशन पुरस्कार हा एक प्रतिष्ठेचा आणि मानाचा पुरस्कार समजला जातो.

महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे प्राचार्य काशिनाथ भोईर यांना राज्यस्तरीय Best Principal पुरस्कार प्रदान 
महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे प्राचार्य काशिनाथ भोईर यांना राज्यस्तरीय Best Principal पुरस्कार प्रदान

 

मागील दोन वर्षांपूर्वीच त्यांना मेस्टाचा राज्यस्तरावरील Excellent Principal हा पुरस्कार मिळाला असून मागील वर्षी त्यांना महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, मुंबई यांचा “गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाला आहे. त्या मध्ये STAR AWARD 2024 या पुरस्काराची भर पडल्यामुळे प्रा. काशिनाथ भोईर यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
STAR AWARD पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे संचालक रणजितजी सावरकर, संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, कोषाध्यक्ष सुरेशजी जाधव आणि संस्थेच्या पदाधिकारी मंजिरी मराठे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.