२४ ऑगस्टचा मविआचा Maharashtra Bandh बेकायदेशीर; उच्च न्यायालयाचे सरकारला ‘हे’ निर्देश

Maharashtra Bandh : राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.

471
Maharashtra Bandh : महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांकडून नोटीस

महाविकास (MVA) आघाडीने २३ ऑगस्ट रोजी पुकारलेला महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) बेकायदेशीर असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. मुंबई उच्च न्यायालयाने याविषयी राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. सायंकाळी पाच वाजेपर्यंत न्यायालयाचे लेखी आदेश जारी होतील.

(हेही वाचा – ICC Test Ranking : आयसीसी क्रमवारीत भारतीयांचाच दबदबा, रोहित दुसऱ्या स्थानावर, विराट कुठे?)

बंद राजकीय प्रेरित असल्याचा आरोप

बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी उत्स्फूर्त आंदोलने करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये बंद पुकारला आहे. दुसरीकडे हा बंद राजकीय प्रेरित असल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात या बंदविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकाकर्त्यांमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतरांच्या याचिकांचाही समावेश आहे.

महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता २४ ऑगस्ट रोजी राज्यामध्ये बंद पुकारला आहे, असा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात या बंद विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या न्याय पीठापुढे या प्रकरणाची सुनावणी होत आहे.

ठाण्यातील बदलापूर (Badlapur School Case) आदर्श शाळेतील घटनेतील आरोपींना अटक झाल्यानंतरही जनआंदोलन सुरूच आहे. लोकांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने उद्या म्हणजेच 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. विरोधकांच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर आज सुनावणी होत आहे. प्रत्यक्षात या काळात शाळा, महाविद्यालये, बँका आणि इतर अनेक संस्था बंद राहिल्याने राज्यातील जनतेचे मोठे हाल होणार असल्याचा युक्तिवाद या बंदबाबत न्यायालयात करण्यात आला आहे. अशा स्थितीत हा बंद पुढे ढकलण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

वकील गुणरत्न सदावर्तेंचा युक्तीवाद काय?

बदलापुरातील ज्या घटनेसाठी विरोध होतोय तो योग्यच आहे. दोन लहान मुलींच्या बाबतीत जे काही घडलं, त्यासाठी आरोपीला फाशीच झाली पाहिजे. पण त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं आहे. त्यासाठी संपूर्ण राज्याला वेठीस धरणं चुकीचं आहे. बदलापुरात त्या दिवशी 10 तास लोकांनी रेल रोको केला. पोलिसांवर जमावाने दगडफेक केली. मात्र अशा मुद्यांवर राजकारण होणं हे चुकीचं आहे. उद्याच्या बंदसाठी राज्यातील विरोधी पक्षानं कार्यक्रम जाहीर केला आहे. लोकल ट्रेन, बस सेवा, रस्ते कसे बंद करायचे याचं नियोजन करण्यात आलं आहे. विरोध करण्याचा हा मार्ग राज्याच्या हिताचा नाही. यामुळे शाळा, महाविद्यालय, रूग्णालय यांना मोठा फटका बसेल. राज्याचा एका दिवसाचा कितीतरी मोठा महसूलही बुडेल, असा युक्तीवाद याचिकाकर्त्यांच्या वतीनं डॉ. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी युक्तीवाद केला. (Maharashtra Bandh)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.