Maharashtra Assembly Election : मुंबईत कसा वाढला मतदानाचा टक्का?

1038
Assembly Election : विधानसभेत चालला नाही मुस्लिमांचा फतवा; 'एक है तो सेफ है' ने वाढला हिंदूंच्या मतांचा टक्का
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई शहरातील १० विधानसभा मतदारसंघात ५२.६५ टक्के आणि उपनगरांतील २६ अशाप्रकारे ३६ विधानसभा मतदार संघातील मतदानात ५६.३९ टक्के अंतिम मतदान झाले. सन २०१९च्या निवडणुकीतील मतदानापेक्षा मतदानाचा टक्का काही प्रमाणात वाढले ४८.२६ टक्के तसेच उपनगरांमध्ये टक्के वाढल्याचे पाहायला मिळाले. सर्वसाधारणपणे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेला होणाऱ्या मतदानाचा टक्का कमी असला तरी प्रत्यक्षात मागील २०१९च्या आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाच्या तुलनेतही मतदानाचा टक्का वाढला गेला आहे. याला सोसायटी आणि उत्तुंग इमारतींमध्ये तयार केलेल्या मतदानाचा केंद्राची उभारणी हेच प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. लोकांना घराजवळ मतदान केंद्र उपलब्ध करून दिल्यामुळे मतदानाचा टक्का काही प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. (Maharashtra Assembly Election )

मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याच्या निवडणुकीची जबाबदारी महापालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आल्यानंतर त्यांनी राज्याचे निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम आणि अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांच्या निर्देशानुसार मुंबईत निवडणुकीची यंत्रणा रबावण्यात आली. सात जिल्हा अतिरिक्त निर्णय अधिकारी यांच्या मदतीने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भूषण गगराणी यांनी राबवलेल्या निवडणूक यंत्रणेमुळे मोठा परिणाम मतदानाद्वारे दिसून आला आहे. (Maharashtra Assembly Election )

(हेही वाचा – PM Narendra Modi यांनी रचला मोठा इतिहास; नेहरू अन् इंदिरा गांधींनाही मागे टाकले, हे आहे कारण)

मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये शहर भागात ५२.६५ टक्के मतदान नोंदवले गेले तर उपनगर जिल्ह्यात ५६.३९ टक्के एवढे मतदान नोंदवले गेले. मुंबईमध्ये शाळांसह समाज कल्याण केंद्र यासह यंदा गृहनिर्माण सोसायटी तसेच उत्तुंग इमारतींमध्ये मतदान केंद्र उभारत एकप्रकारे मतदारांना घराशेजारीच मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे याचा फायदा चांगल्याप्रकारे दिसून आला. गृहनिर्माण सोसायटी आणि उत्तुंग इमारतींमधील मतदान केंद्रांच्या काही ठिकाणी तब्बल ९० ते ९२ टक्के मतदान झाल्याचे पहायला मिळाले तरी काही गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय मतदान केंद्रांमध्ये मोबाईल फोन नेण्यास बंदी असल्याने केंद्राबाहेर पोलिस सुरक्षेत मोबाईल फोन ठेवून मतदान करण्याची मुभा देण्यात आल्याने मतदारांना परत जाण्याची गरज भासली नाही तसेच गोंधळ होऊ शकला नाही. तसेच याचा परिणाम मतदानातून दिसून आला. (Maharashtra Assembly Election )

गृहनिर्माण सोसायटी, उत्तुंग टॉवरमधील मतदान केंद्र आणि मोबाईल फोन ठेवण्याची व्यवस्था मतदान केंद्रनिहाय केलेली व्यवस्था तसेच मतदार यादीतील घोळ नसल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा टक्का काही अंशी वाढल्याचे दिसून येत आहे. (Maharashtra Assembly Election )

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.