Maharashtra Assembly Election 2024 : मुंबईत सुमारे ७ हजार स्वयंसेवकांनी लावला मतदानाला हातभार

392
Maharashtra Assembly Election 2024 : मुंबईत सुमारे ७ हजार स्वयंसेवकांनी लावला मतदानाला हातभार
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी मतदाराच्या मदतीसाठी ७ हजार ११५ स्वयंसेवक मुंबईतील विविध मतदान केंद्रांवर कार्यरत होते. यामध्ये ९८ महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेत (एनएसएस) सहभागी २ हजार ८०० विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) ७५० विद्यार्थी, नागरी संरक्षणातील ३२३ सदस्य, आपदा मित्र/सखी २००, नेहरू युवा केंद्राचे ३८ सदस्य आणि अन्य ३ हजार ००४ सदस्य यांचा समावेश होता. या स्वयंसेवकांनी मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच ज्येष्ठ मतदारांना सहाय्य, रांगांचे व्यवस्थापन आदी जबाबदाऱ्या योग्यपणे पार पाडल्या. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा – Maharashtra Election Exit Poll पहा एका क्लिकवर; महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार?)

विविध संकल्पनांमध्ये साकारले मतदान केंद्र, मतदारांचे जोरदार स्वागत

मुंबईतील विविध मतदारसंघांमध्ये ८४ मॉडेल मतदान केंद्र उभारण्यात आले होते. त्यामध्ये संपूर्णत: युवा कर्मचाऱ्यांद्वारा संचालित, महिलांद्वारा संचालित तसेच दिव्यांगाद्वारा संचालित मतदान केंद्रांचा समावेश होता. विलेपार्ले येथील संत झेवियर माध्यमिक शाळेत सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. हे संपूर्ण मतदान केंद्र फुलांनी सजविण्यात आले होते. तर, अनेक ठिकाणी मतदारांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा – CM Eknath Shinde यांचा विरोधकांना टोला; म्हणाले, राज्याची दशा कुणी केली अन् दिशा कुणी दिली…)

मतदानासाठी नामवंत मान्यवरांची मांदियाळी, सोयीसुविधांबाबत प्रशासनाचे कौतुक

सोमवारीविधानसभा निवडणूक-२०२४ साठी मुंबईत महिला, पुरुष, नवमतदार, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आदींमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. यासोबतच, चित्रपट, कला, क्रीडा, राजकीय, प्रशासन आणि अन्य क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी मुंबईत विविध ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, भारतरत्न सचिन तेंडुलकर, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, गायिका आशा भोसले, गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर, सिनेसृष्टीतील परेश रावल, हेमा मालिनी, राकेश रोशन, अक्षय कुमार, माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रे, कार्तिक आर्यन, राजकुमार राव, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अभिजीत खांडकेकर, सुखदा खांडकेकर, अनिता दाते-केळकर, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, महिमा चौधरी, शमिता शेट्टी, सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टी, हास्यकलाकार समीर चौघुले, गौरव मोरे, दिव्यांग अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ता नीलेश सिंगित आदींनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, मतदान केंद्रांवर प्रशासनाच्या वतीने पुरविण्यात आलेल्या विविध सोयीसुविधांचे विविध मान्यवरांनी कौतुक केले. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा – फेक नरेटिव्ह नव्हे, तर पॉझिटिव्ह कामच जनता निवडणार; CM Eknath Shinde यांचा विश्वास)

विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी झालेले मतदान सुरळीतपणे पार पडले. मतदान केंद्रांवर प्रशासनाकडून पुरविण्यात आलेल्या विविध नागरी सेवासुविधांनी मुंबईतील मतदार सुखावल्याचे चित्र दिसून आले. तर, मतदान केंद्रांवर उत्तम प्रकारच्या सेवासुविधा पुरविल्याबद्दल नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह प्रशासनाचे कौतूक केले. दरम्यान, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईकर मतदारांचे आभार मानले आहेत. मतदानाचा हक्क बजावून नागरिकांनी लोकशाही अधिक बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे, पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी अविरत आणि अथक कर्तव्य बजावणाऱ्या सर्व यंत्रणांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही कौतुक आहे, अशी भावना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी व्यक्त केली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.