Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणूक मुंबईत गोंधळाविना

667
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणूक मुंबईत गोंधळाविना
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मागील लोकसभा निवडणुकीच्या यंदाच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये चांगल्याप्रकारे मतदान केंद्रामध्ये सुविधा पुरवल्यामुळे तसेच मतदार यादीतील कोणताही घोळ नसल्याने एकप्रकारे उत्साहात आणि गोंधळाविना मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यंदाच्या निवडणुकीत मुंबईची जबाबदारी महापालिका आयुक्तांवर सोपवण्यात आल्याने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भूषण गगराणी यांनी दिलेल्या सुचनांनुसार सर्व अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देवून जी यंत्रणा राबवली त्याची प्रतिबिंब मतदानातून उमटले आणि अत्यंत शांततेत आणि कोणत्याही तक्रारीविना ही निवडणूक प्रक्रिया पार पडली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुंबईची जबाबदारी महापालिका आयुक्तांवर सोपवण्याचा पहिलाच प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

तक्रार आणि गोंधळ दिसून आला नाही

मुंबई शहराततील १० आणि उपनगरांतील २६ अश एकूण ३६ विधानसभा मतदारसंघात एकूण १० हजार ११७ मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया पार पडली. या सर्व मतदान केंद्रांमध्ये पार पडलेल्या निवडणूक कामांसाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी या मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक लागणारी यंत्रणा आणि मतदार यादीमधील सुसुत्रता याची विशेष दक्षता घेतल्याने बुधवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची तक्रार आणि गोंधळ दिसून आला नाही.

(हेही वाचा – Maharashtra Election Exit Poll पहा एका क्लिकवर; महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार?)

सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण वेळेत

मतदान केंद्रांवर सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण हे उशिरा पोहोचत होते. परंतु यावेळी एखाद दुसरे मतदान केंद्र वगळता सर्वच मतदान केंद्रांमध्ये सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण एक ते दीड पर्यंत पोहोचले गेले. तसेच प्रत्येक मतदान केंद्रांमध्ये कर्मचऱ्यांसाठी आणि मतदारांनासाठी पिण्याचे पाणी, मतदारांसाठी रांगांमध्ये जास्त उभे राहता येऊ नये म्हणून बसण्यास खुर्चीची व्यवस्था, दिव्यांगांना नेण्यासाठी प्रत्येक केंद्रावर बेस्ट बस आणि इतर वाहनांची सुविधा, व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करून दिली. (Maharashtra Assembly Election 2024)

मतदार यादीत शुल्लक तांत्रिक दोष

मतदान केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यंदा वेळेवर जेवण आणि नाश्ता उपलब्ध झाला तसेच पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. तसेच मतदार यादीतील घोळ तसा पहायला आलेला नाही. काही मतदारांचे नाव, पत्ता व यादी क्रमांक सेम असला तरी त्यांचे छायाचित्र नसल्याने काही तक्रारी होत्या. या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. मात्र, हा तांत्रिक दोष असून संगणकावर मतदारांची छायाचित्रे अपलोड करताना या त्रुटी निर्माण झाल्या होत्या. परंतु त्यांचे प्रमाण अधिक नव्हते. तसेच पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या निवडणुकीत मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत कोणताही त्रास आम्हाला झाला नाही तसेच तसेच शांततेत मतदान झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जेवण नाश्ताही वेळेत उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – CM Eknath Shinde यांचा विरोधकांना टोला; म्हणाले, राज्याची दशा कुणी केली अन् दिशा कुणी दिली…)

मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी म्हणाले की, भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र राज्य), मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा, महानगरपालिका प्रशासनासोबतच विविध तपास यंत्रणा, मुंबई पोलिस आणि अन्य सर्व यंत्रणांच्या सहकार्याने आणि समन्वयामुळे मुंबईतील मतदान अत्यंत चोख आणि सुरळीतपणे पार पडले. मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात महत्वाची भूमिका बजावणारे निवडणूक अधिकारी, केंद्रस्तरीय कर्मचारी, मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा व्यवस्थेत अहोरात्र तैनात असलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा आर्थिक गैरव्यवहार होऊ नये, यासाठी मुंबईत कार्यरत सर्व महसूली तसेच गुप्तचर यंत्रणा, मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष सोयीसुविधा उपलब्ध करुन देणारे प्रशासनातील अधिकारी तसेच त्यांची देखभाल करणारे विविध विभागांचे कर्मचारी, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती करणारे अधिकारी-कर्मचारी, बचत गट, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांचे स्वयंसेवक, आपदा मित्र, दिव्यांग मित्र यांच्यासोबतच या संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांच्या योगदानामुळे मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. यासाठी यंत्रणेतील प्रत्येकांचे कौतूक असल्याची भावनाही गगराणी यांनी व्यक्त केली. (Maharashtra Assembly Election 2024)

प्रशासनाने आपल्या वतीने मतदानासाठी विविध सोयीसुविधांची पूर्तता करून मतदान प्रक्रिया राबविली असली तरीसुद्धा ही प्रक्रिया मतदारांनी दिलेल्या प्रतिसादावर अवलंबून असते. मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व ३६ मतदारसंघांतील मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक बळकट करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. यासाठी मी मुंबईतील प्रत्येक मतदाराचे आभार मानतो, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी गगराणी म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.