Love Jihad व्हाया गोमांस, धर्मांतर; तीन प्रकरणे, शादाब, शहजाद, अरशद यांचा डाव

देशातील तीन राज्यात वेगवेगळ्या घटना

117
Love Jihad व्हाया गोमांस, धर्मांतर; तीन प्रकरणे, शादाब, शहजाद, अरशद यांचा डाव
Love Jihad व्हाया गोमांस, धर्मांतर; तीन प्रकरणे, शादाब, शहजाद, अरशद यांचा डाव

देशातील ३ वेगवेगळ्या राज्यातून लव्ह जिहादची (love jihad) प्रकरणे उघडकीस आली आहेत. मध्य प्रदेशमधील शादाब (Shadab), उत्तराखंडमधील शहजाद (Shehzad) आणि उत्तर प्रदेशमधील अरशदच्या (Arshad) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मध्य प्रदेशमध्ये हरादात हिंदू (Hindu) मुलीचा इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा कट रचला होता. उत्तराखंडमधील देहराडूनमध्ये तलाक दिल्याने विभक्त असलेल्या महिलेने आपल्या मुलीला वाचवण्याची विनवणी केली. उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे पीडित तरुणीला गोमांस खाण्यास जबरदस्ती करण्यात आली. त्यामुळे अशरदला अटक करण्यात आले.

( हेही वाचा : विधानसभेच्या निवडणुकीत जनताच मतपेटीद्वारे विरोधकांचा ‘एन्काऊंटर’ करेल – CM Eknath Shinde

धर्मांतरासाठी शादाबचा पीडितेवर दबाव

लव्ह जिहादची (love jihad) पहिली घटना मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील आहे. तिथे दि. २७ सप्टेंबर रोजी हिंदू मुलगी आपल्या परिवारातील सदस्यांसह हंडिया पोलिस स्टेशन येथे आली. तिने सांगितले की, २ वर्षापूर्वी तिला शादाब नावाच्या तरुणाने फसवले. शादाबने प्रेम करत असल्याचे नाटक करत दोन वर्ष तिच्यावर लैगिक शोषण केले. त्यानंतर विरोध केल्यावर निकाह करणार असल्याचे सांगून तो तिला गप्प करू लागला. मात्र दि. २९ मे रोजी पीडिता एकटी घरी असताना शादाबने इस्लाम धर्म स्विकारण्याची तिच्यावर जबरदस्ती केली. त्यामुळे वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने अखेर पोलिस स्टेशन गाठले. शादाबच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ६९, ६४(२) (ड) आणि ३५१ (३) च्या सोबत मध्य प्रदेश धार्मिक स्वतंत्रता अधिनियमच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

देहराडूनमध्ये शहजादच्या विरोधात तक्रार

शहजादने दोन मुलांची आई असलेल्या तलाक झालेल्या महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तरी महिलेने दि. २६ सप्टेंबर रोजी रायपूर पोलिसमध्ये तक्रार दाखल केली. पीडित महिलेने सांगितले की, तिची मुलगीच आता नाराज होऊन शहजाद सोबत राहते. त्याने माहेरकडची आपली दुचाकीही घेऊन गेला. त्याने आपल्या मुलीचा ब्रेनवॉश केल्याचे ही पीडितेने सांगितले.

गोमांस खाण्यास पीडितेवर जबरदस्ती

लखनऊमध्ये अरशदने हिंदू महिलेला गोमांस खाण्यास जबरदस्ती केली. दि. २७ सप्टेंबर रोजी हिंदू महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. पीडित महिला आणि अरशद हे एका मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला भेटले. पुढे दोघांचे एकमेकावर प्रेम झाले. त्यानंतर त्यांनी शारीरीक संबंध बनवले. ज्यामुळे ती २ वेळा गर्भवती राहिली. मात्र पीडितेने लग्न करण्यास दबाव टाकल्यावर त्याने इस्लाम कबूल करण्यास आणि गोमांस खाण्यास जबरदस्ती केली.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.