गणेशोत्सवात जे हानीकारक आहे, ते ईदमध्येही हानीकारकच; Bombay High Court ने निकाली काढली याचिका

178
गणेशोत्सवात जे हानीकारक आहे, ते ईदमध्येही हानीकारकच; Bombay High Court ने याचिका निकाली काढली
गणेशोत्सवात जे हानीकारक आहे, ते ईदमध्येही हानीकारकच; Bombay High Court ने याचिका निकाली काढली

गणेशोत्सवात लाउडस्पीकरचा व अन्य साउंड सिस्टीमचा वापर करणे हानीकारक असेल, तर ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकांमध्येही तोच परिणाम होतो, असे मुंबई उच्च उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपिठासमोर ईदच्या काळात डीजे, डान्स आणि लेझर लाइटच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने वरील टिप्पणी केली. जे गणेशोत्सवात (Ganeshotsav 2024) हानीकारक आहे, ते ईदमध्येही हानीकारक आहे, असे म्हणत न्यायालयाने (Bombay High Court) याचिका निकाली काढली.

(हेही वाचा – बांगलादेशी घुसखोरीची ED करणार चौकशी)

ईदच्या मिरवणुकांमध्ये लाउडस्पीकर आणि अन्य साऊंड सिस्टीमच्या वापराला परवानगी न देण्याचे आदेश महापालिका आणि पोलिसांना द्यावेत, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे. कुराण, हदीसमध्ये कोणत्याही उत्सवासाठी डीजे किंवा लेझर बीम वापरण्याची शिफारस नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. गेल्या महिन्यात काढण्यात आलेल्या आदेशाचा न्यायालयाने या वेळी संदर्भ दिला. या आदेशाद्वारे ध्वनीप्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, २००० अंतर्गत, ठरवलेल्या ध्वनी मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या लाउडस्पीकर आणि अन्य साउंड सिस्टीमच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

अन्य सणांमध्ये ईदचाही समावेश करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील ओवेस पेचकर यांनी केली. आदेशात ‘सार्वजनिक सण’ असे नमूद करण्यात आल्याने ईदचा वेगळा उल्लेख करण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने म्हटले. (Bombay High Court )

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.