Libya Floods : लिबियामध्ये महापुरामुळे 3 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

26
Libya Floods : लिबियामध्ये महापुरामुळे 3 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
Libya Floods : लिबियामध्ये महापुरामुळे 3 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

जगाच्या पाठीवर सुरू असणाऱ्या अनेक घटनांमुळे चिंता वाढली आहे. (Libya Floods) मोरक्कोच्या भूकंपानंतर लिबियामध्ये आलेल्या चक्रीवादळ आणि महापुरामुळे विनाशाचं वेगळंच रूप बघायला मिळत आहे. लिबियामध्ये आलेल्या या आपत्तीमुळे प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाल्यामुळे लिबिया हे राष्ट्रच कोलमडलून गेलं आहे.

(हेही वाचा – Simona Halep Banned : महिला टेनिसपटू सिमोना हालेपवर उत्तेजक चाचणी नियम उल्लंघना प्रकरणी ४ वर्षांची बंदी)

लिबियातील महापुरामुळे शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. या पुराचा सर्वाधिक फटका डेरना शहराला बसला असून इथे चिखलाखाली 700 हून जास्त नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत या पुरामुळे जवळपास 3 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून 10 हजारांहून जास्त नागरिक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अतीवृष्टीनंतर बांध तोडून पाण्याचे लोट वाहू लागल्यामुळं लिबियातील अनेक शहरं जलमय झाली. काही भागांमध्ये पुराचं पाणी ओसरत नसल्यामुळे मृतदेहही हाती लागत नसल्यामुळं बचाव यंत्रणांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. (Libya Floods)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.