Laxmidhar Behra : लोकांनी मांस खाल्ल्याने हिमाचलमध्ये भूस्खलन; IITच्या संचालकांचे अजब विधान

तर हिमाचल प्रदेशची आणखी हानी होईल

23
Laxmidhar Behra : लोकांनी मांस खाल्ल्याने हिमाचलमध्ये भूस्खलन; IITच्या संचालकांचे अजब विधान

हिमाचल प्रदेशातील मंडी येथे असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (आयआयटी) संचालक (Laxmidhar Behra) लक्ष्मीधर बेहरा यांनी एक अजब विधान केलं आहे. त्यानुसार त्यांनी विद्यार्थ्यांना मांस न खाण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले. तसेच मांस खाल्ल्यानेच राज्यात दरड कोसळण्याच्या आणि ढगफुटीच्या घटना घडत असल्याचा दावा केला. त्यामुळे सध्या त्यांच्या या अजब वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना बेहरा (Laxmidhar Behra) म्हणाले, “जर आपण असेच करत राहिलो तर हिमाचल प्रदेशची आणखी हानी होईल. तुम्ही इथे निष्पाप प्राण्यांची हत्या करत आहात. प्राण्यांचा पर्यावरणाच्या ऱ्हासाशीही संबंध आहे. तुम्हाला ते सध्या दिसत नाही, पण हे सत्य आहे.

(हेही वाचा – Dhangar Reservation : आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक; आरक्षण समितीच्या कार्यकर्त्याने राधाकृष्ण विखे-पाटलांवर भंडारा उधळला)

बेहरा (Laxmidhar Behra) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. “वारंवार भूस्खलन, ढगफुटी आणि इतर अनेक गोष्टी घडत आहेत, हे सर्व प्राण्यांवरील क्रूरतेचा परिणाम आहे. ‘चांगली व्यक्ती होण्यासाठी काय करावे? तर त्यासाठी मांस खाणे बंद करावे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मांस न खाण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले.

काही नेटकऱ्यांनी बेहरा (Laxmidhar Behra) यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. तर या वादावर बेहरा यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.